क्‍लीअरट्रिपने ‘Cleartrip for Work’ सह व्‍यावसायिक प्रवाशांसाठी सादर केले कॉर्पोरेट फायदे

कामानिमित्त प्रवास करताना फ्लाइट्सवर जवळपास १० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करा.

154
क्‍लीअरट्रिपने 'Cleartrip for Work' सह व्‍यावसायिक प्रवाशांसाठी सादर केले कॉर्पोरेट फायदे

क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने त्‍यांची नवीन ऑफरिंग ‘क्‍लीअरट्रिप फॉर वर्क’ (सीएफडब्‍ल्‍यू) च्‍या लाँचची घोषणा केली. विशेषत: व्‍यावसायिक प्रवासी, शहरी उद्योजक आणि स्‍टार्टअप संस्‍थापकांसाठी डिझाइन केलेले हे सोल्‍यूशन विशेष कॉर्पोरेट फ्लाइट दर व अतिरिक्‍त फायदे उपलब्‍ध करून देते. (Cleartrip for Work)

(हेही वाचा – NEET UG परीक्षेत कोणत्याही त्रुटी नाहीत; आयआयटी मद्रासच्या अहवालाचा केंद्राने दिला दाखला)

क्‍लीअरट्रिप फॉर वर्क कशाप्रकारे वेगळे आहे?

  • विशेष दर आणि जीएसटी इनपुट क्रेडिटच्‍या माध्‍यमातून प्रवास खर्चांवर जवळपास १० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करा.
  • कॉम्‍प्लीमेण्‍टरी इन-फ्लाइट मील्‍स, कमी/शून्‍य कॅन्‍सलेशन शुल्‍क आणि मोफत सीट सिलेक्‍शनचा आनंद घ्‍या.
  • विशेष रिवॉर्ड बेनीफिट ‘अर्थ सुपरकॉईन्‍स’ फक्‍त फ्लिपकार्ट, क्‍लीअरट्रिप व मिंत्रा वापरकर्त्‍यांसाठी प्रत्‍येक व्‍यवहारावर उपलब्‍ध आहे आणि सीएफडब्‍ल्‍यू बुकिंगला अधिक लाभदायी करण्‍यासाठी वापरता येऊ शकते.
  • उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच, सहजपणे निर्णय घेण्‍यासाठी एकाच ठिकाणी सर्व दर प्रकारांची तुलना करा.
    सीएफडब्‍ल्‍यू विनासायास, वन-क्लिक ऑनबोर्डिंग प्रक्रिया आणि सुलभ वापरामुळे वरचढ ठरते. वापरकर्ते त्‍यांच्‍या मोबाइल क्रमांकाचा वापर करत साइन अप करू शकतात आणि प्रत्‍यक्ष Cleartrip home page वरून वैशिष्‍ट्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे सीएफडब्‍ल्‍यू विशेषत: वारंवार विमान प्रवास करणाऱ्या व्‍यावसायिकांसाठी अविश्‍वसनीयरित्‍या सोईस्‍कर आहे. (Cleartrip for Work)

(हेही वाचा – WhatsApp कडून वापरकर्त्‍यांना सुरक्षित ठेवण्‍यासाठी ग्रुप मेसेजिंगमध्‍ये कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच)

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत चीफ बिझनेस अँड ग्रोथ ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, ”भारतातील ३० दशलक्षहून अधिक सूक्ष्‍म-उद्योजकांपैकी बहुतांश उद्योजक अनेकदा प्रवास करतात, ज्‍यामुळे कॅन्‍सलेशन, सीट सिलेक्‍शन व मील्‍स असे प्रवाससंबंधित फायदे किफायतशीर दरांमध्‍ये मिळण्‍याची गरज आहे. सीएफडब्‍ल्‍यूच्‍या माध्‍यमातून क्‍लीअरट्रिपने विशेष विमानप्रवास दरांसह स्थिरता आणली आहे, ज्‍यामध्‍ये सुपरकॉइन्‍सचा समावेश करण्‍यात आला आहे. ज्‍यामुळे हे व्‍यावसायिक प्रवाशांसाठी सर्वात स्थिर व किफायतशीर गंतव्‍य आहे. आम्‍ही सीएफडब्‍ल्‍यूमध्‍ये गुंतवणूक करत राहू आणि ग्राहकांसाठी नाविन्‍यपूर्ण व मूल्‍य-आधारित ऑफरिंग्‍ज सादर करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.” (Cleartrip for Work)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.