आम आदमी पक्ष सध्या खुप अडचणीत आहे. त्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन पक्षांतील कार्यकर्ते आणि आमदार भाजपा प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व माजी आमदार वीणा आनंदही भाजपामध्ये दाखल झाल्या आहेत. राजकुमार आनंद यांनी एप्रिल महिन्यात दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. (AAP)
आनंद पती-पत्नीसह आम आदमी पार्टीचे वीद्यमान आमदार करतारसिंग तंवर, रत्नेश गुप्ता, चिन राय आणि नगरसेवक उमेदसिंह फोगट यांनीही तसेच दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व माजी आमदार वीणा आनंदही भाजपामध्ये दाखल झाल्या आहेत. राजकुमार आनंद यांनी एप्रिल महिन्यात दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्रिपदाचा जीनामा दिला होता. त्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह सचदेवा आणि पक्षाचे सरचिटणीस अरुणसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच्याअगोदरच या नेत्यांच्या भाजपा प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला मोठा हादरा बसल्याचे मानले जाते आहे. (AAP)
(हेही वाचा – BMC : महापालिकेत आजही आहेत प्रामाणिक अधिकारी; मुलुंडमध्ये सौंदर्यीकरणात अनावश्यक होणारा दीड कोटींचा खर्च वाचवला)
विद्यमान आमदारांनी केला भाजपामध्ये प्रवेश
मंत्रिपदाचा राजीनामा देतानाच राजकुमार आनंद म्हणाले होते. की भ्रष्टाचाराच्या विषयावर आम आदमी पक्षाची जी धोरणे आहेत त्याच्याशी ते सहमत नाहीत. त्यावेळी म्हणजे एप्रिल महिन्यात ते आपची साथ सोडत बहुजन समाज पक्षात सहभागी झाले होते. तेव्हाही ते भाजपामध्ये दाखल होणार, असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. (AAP)
कोण आहेत करतारसिंग तंवर?
दिल्लीच्या छत्तरपूर येथून आम आदमी पार्टीच्या तिकिटावर आमदार झालेले करतारसिंग तंवर पूर्वी २०१६ मध्ये अचानक चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकलेल्या छापेमारीत त्यांच्याकडे १३० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता असल्याचे आढळले होते. इनकम टॅक्सने केलेल्या छापेमारीत त्यांच्या २० कंपन्यांची नावे उघड झाली होती. तंवर यांचे घर, कंपन्या, फार्म हाऊस आदींसह एकाच वेळी ११ ठिकाणी १०० पेक्षा जास्त जणांच्या टीमने रेड टाकली होती. तंवर यांच्याकडे तेव्हा १ कोटी रोख रक्कम आढळून आली होती. आपमध्ये दाखल होण्यापूर्वी ते भाजपाचे नगरसेवक होते. (AAP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community