महापालिकेमुळे पावसाळा ठरतोय जीवघेणा! २ महिला गटारात पडल्या!

ऑगस्ट २०१७मध्ये मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या आठवणी ताज्या झाल्या. पावसाचे पाणी जाण्यासाठी महापालिका कामगारांनी मॅनहोलचे झाकण काढले होते. त्याच मॅनहोलमध्ये डॉ. अमरापूरकर पडले आणि वाहून गेले होते. 

135

९ जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादण उडाली. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्ते, फुटपाथ आणि गटारे सगळेच पाण्याखाली गेले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यांमधून अंदाज काढत पुढे पुढे चालण्याची कसरत पुन्हा एकदा मुंबईकरांना करावी लागली. असाच अंदाज घेऊन भांडुप येथील व्हिलेज रोड येथील एका फुटपाथवरून पादचारी चालत होते. त्या फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटले होते. हे लक्षात न आल्याने त्या गटारात एकामागोमाग एक दोन महिला पडून जखमी झाल्या. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यामुळे महापालिकेचा निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा अधोरिखित झाला आहे. या घटनेने ऑगस्ट २०१७मध्ये मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या आठवणी ताज्या झाल्या. पावसाचे पाणी जाण्यासाठी महापालिका कामगारांनी मॅनहोलचे झाकण काढले होते. त्याच मॅनहोलमध्ये डॉ. अमरापूरकर पडले आणि वाहून गेले होते.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस झाला, दीड कोटींचा खर्च केला, तरीही डोळा गमावला! )

मुंबई महापालिका कुंभकर्णाच्या झोपेतून जागी होणार का? डॉ. अमरापूरकरांच्या घटनेनंतरही महापालिकेने धडा घेतला नाही. महापालिका कोणत्याही मोठ्या अपघातांची वाट पहात आहे का? किती काळ लोकांच्या आयुष्याशी खेळणार? महापालिकेने मॅनहोलचा मुद्दा गांभीर्याने घ्यायला हवा. या महिलांचे प्राण वाचले ही आनंदाची बाब आहे. पण दुःखाची बाब म्हणजे अद्याप महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.
– मनोज कोटक, खासदार, भाजप.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.