Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरची नजर अष्टपैलू फिरकीपटूच्या जागेवर

Washington Sundar : रवींद्र जाडेजाच्या टी-२० निवृत्तीनंतर वॉशिंग्टन सुंदरने या जागेवर दावेदारी ठोकली आहे. 

200
Ind vs SL, 3rd T20 : बघूया वॉशिंग्टन सुंदरची प्रभावी सुपर ओव्हर
  • ऋजुता लुकतुके

झिंबाब्वे विरुद्घच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने १५ धावांत ३ बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आणि त्याचबरोबर भारतीय संघातील अष्टपैलू फिरकीपटूच्या जागेवर त्याने दावेदारी ठोकली आहे. ही जागा सध्या रवींद्र जाडेजाच्या निवृत्तीमुळे खाली झाली आहे. अक्षर पटेल हा डावखुरा फिरकीपटू आधीच भारतीय संघात आहे. शिवाय कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलही निव्वळ फिरकीपटू म्हणून चांगली कामगिरी करतोय. पण, अष्टपैलू म्हणून संघात आणखी एक जागा निर्माण होऊ शकते, याची वॉशिंग्टन सुंदरला कल्पना आहे. (Washington Sundar)

म्हणूनच रवींद्र जाडेजाच्या जागेसाठी आपण उत्सुक आहोत, असं वॉशिंग्टनने जाहीरपणे म्हटलं आहे. ‘माझ्याकडे जे काही आहे, ते मी संघासाठी देण्याची वेळ आली आहे. सामन्या दरम्यान आणि माझ्या सरावात मला सातत्य दाखवावं लागेल. पण, आता कामगिरीत शंभर टक्के योगदान करण्याची वेळ आली आहे,’ असं वॉशिंग्टन हरारेमधून पीटीआयशी बोलताना म्हणाला. (Washington Sundar)

(हेही वाचा – Ashadhi Wari 2024: ‘हरिनामाचा गजर’ करत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापुरात दाखल)

भारतीय संघात मी खेळू शकेन असं मला वाटतंय – वॉशिंग्टन

तामिळनाडूचा हा गोलंदाज झिंबाब्वे दौऱ्यात चमकला आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात ४ षटकांत त्याने फक्त १५ धावा दिल्या आणि ३ बळीही मिळवले. भारताच्या १८२ धावांना उत्तर देताना झिंबाब्वेनं ६ बाद १६९ धावा केल्या. २३ धावांनी मिळवलेल्या या विजयात वॉशिंग्टनची कामगिरी निर्णायक ठरली. (Washington Sundar)

‘माझा सराव चांगला सुरू आहे. त्यातूनच मला आत्मविश्वास मिळतो. भारतीय संघात मी खेळू शकेन असं मला वाटतंय,’ असं वॉशिंग्टन म्हणाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर वॉशिंग्टन सुंदर गेली दोन वर्षं संघाचे दरवाजे ठोठावत आहे. त्याला संधीही मिळतेय. २४ वर्षीय वॉशिंग्टन भारताकडून ४ कसोटी, १९ एकदिवसीय आणि ४१ टी-२० सामने खेळला आहे. तीनही प्रकारात त्याने प्रत्येकी एक अर्धशतक ठोकलं आहे. (Washington Sundar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.