प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांनी केलेल्या चुकीच्या बाबी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या आईने धक्कादायक प्रकार केला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते. त्यासंदर्भातील चित्रिकरण करण्यासाठी माध्यमे पोहचली. परंतु आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चित्रीकरणास विरोध करत होत्या. त्यामुळे मुलगी तर मुलगी परंतु तिच्या आईने कळस गाळला.
(हेही वाचा Mumbai Crime: लोकल ट्रेनसमोर आयुष्य संपवणाऱ्या बापलेकाच्या घरी सापडली चिठ्ठी, काय आहे चिठ्ठीत?)
पुणे पोलिसांनी का केली कारवाई?
पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी 21 हजार रुपयांचा दंड केला. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहचले. त्यावेळी पूजा यांची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या. कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
अखेर वाशिममध्ये झाल्या रूजू
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) त्यांची पुण्यातून बदली झाली. या बदलीनंतर त्यांना वाशिममध्ये रुजू होण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरुवारी त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. आपण आज रुजू झालो आहोत, वाशिममध्ये आल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर कार्यरत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community