लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) पराभव झाला तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेच्या निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. येत्या १४ जुलैला बारामतीत त्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले, असून त्यानंतर पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. (Jansanman Mahamelava)
(हेही वाचा – Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निकालानंतरच राज्यात नवी राजकीय समीकरणे)
मंगळवारी (९ जुलै) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार व नेते मंडळींनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन (Ajit Pawar Siddhivinayak Darshan) घेतले. त्यावेळी अजित पवारांनी सभेच्या नियोजनाची माहिती दिली. त्यानंतर राज्यातील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आले आहे. दरम्यान ही सभा मिशन हायस्कूलच्या मैदानावर १४ जुलैला दुपारी १ वाजता होणार आहे. जनसन्मान महामेळावा (Jansanman Mahamelava) असे या सभेचे नामकरण करण्यात आले आहे. पक्षाचे खासदार प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यापासून ते राज्यातील सर्व आमदार, मंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. (Jansanman Mahamelava)
(हेही वाचा – Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरची नजर अष्टपैलू फिरकीपटूच्या जागेवर)
राज्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या सभेपासून पुढे विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीपर्यंत अजित पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या दौऱ्याबाबत कळवण्यात आले आहे. (Jansanman Mahamelava)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community