global vipassana pagoda : ग्लोबल विपश्यना केंद्राबद्दल तुम्हाला “या” गोष्टी माहिती आहेत का?

135
global vipassana pagoda : ग्लोबल विपश्यना केंद्राबद्दल तुम्हाला "या" गोष्टी माहिती आहेत का?

ग्लोबल विपश्यना पॅगोडा हा एक खास ध्यान करण्यासाठी तयार करण्यात आलेला घुमट असलेला हॉल आहे. जगातला सर्वात मोठा विपश्यना पॅगोडा हॉल महाराष्ट्रातील मुंबई उपनगर बोरीवलीत गोराईच्या जवळ बांधण्यात आला आहे. एकाच वेळी सुमारे ८,००० लोक या हॉलमध्ये ध्यान करायला बसू शकतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम.टी.डी.सी. आणि ए.बी.पी. माझाने गोराई इथल्या ग्लोबल मेडिटेशन पॅगोडाला महाराष्ट्रातल्या सात आश्चर्यांपैकी एक घोषित केलं आहे. महाराष्ट्रातल्या ३५० पर्यटनस्थळांचं परावलोकन केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. (global vipassana pagoda)

कधी झालं लोकार्पण?

ग्लोबल विपश्यना पॅगोडाचं लोकसमर्पण ८ फेब्रुवारी २००९ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. ग्लोबल विपश्यना पॅगोडा हा अरबी समुद्र आणि गोराई खाडी यांच्यादरम्यान असलेल्या द्वीपसमूहांपैकी दान केलेल्या एका जमिनीवर बांधलेला आहे. (global vipassana pagoda)

कोणी निभावली महत्त्वाची भूमिका?

सयागी उ बा खिन हे विपश्यना गुरू आणि स्वतंत्र बर्मा देशाचे महालेखापाल होते. त्यांनी विपश्यना आपल्या मूळ देशात परत आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी विपश्यनेसाठी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोरीवलीतल्या गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडा ही वास्तू बांधण्यात आली आहे. ही वास्तू शांतता आणि सौहार्दाचं स्मारक आहे. (global vipassana pagoda)

(हेही वाचा – होमगार्ड जवानांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा द्या – MLC Satyajeet Tambe )

कोणी दिल्या देणग्या?

ग्लोबल विपश्यना पॅगोडा बांधण्यासाठी जगभरातल्या विपासकांनी ऐच्छिक देणग्या दिल्या आहेत. या देणग्यांमधूनच ही एवढी मोठी वास्तू उभी राहिली आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये विपश्यनेबद्दल आणि बुद्धांच्या शिकवणीबद्दल माहिती दिली जाते. विपश्यना हे बुद्धांच्या सर्वभौमिक आणि सांप्रदायिक शिकवणीचं रूप आहे. (global vipassana pagoda)

म्यानमारमधील गोल्डन पॅगोडाचे प्रतिरुप

गोराई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडाची वास्तू ही म्यानमारमधल्या गोल्डन पॅगोडासारखीच दिसते. गोल्डन पॅगोडा ही वास्तू भारतातल्या प्राचीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधून बांधली गेली होती. या वास्तूला एक हजार वर्षं पूर्ण झालेली आहेत. म्हणूनच ग्लोबल विपश्यना पॅगोडाची रचना पारंपरिक बर्मी पद्धतीने केलेली आहे. (global vipassana pagoda)

ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या मध्यभागी कोणताही आधार न घेता बांधलेला दगडाचा सर्वात मोठा घुमट आहे. या घुमटाची उंची अंदाजे २९ मीटर एवढी आहे. तर इमारतीची उंची ९९.०६ मीटर एवढी आहे. घुमटाच्या खाली हॉलमध्ये आठ हजार लोक एकत्र बसून विपश्यना करू शकतात. (global vipassana pagoda)

ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे एस.एन. गोयंका यांनी शिकवलेल्या तसेच १०० पेक्षा जास्त देशांमध्ये सराव करण्यात येणाऱ्या गैर-सांप्रदायिक विपश्यना ध्यानाचा सराव केला जातो. २१ डिसेंबर २००८ साली पॅगोडा येथे उद्घाटनाच्या निमित्ताने एक दिवसीय विपश्यना अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गोयंका हे शिक्षक म्हणून तिथे उपस्थित होते. ग्लोबल विपश्यना पॅगोडा संकुलाचाच भाग असलेल्या धम्म पट्टण ध्यान केंद्रामध्ये दहा दिवसीय विपश्यना ध्यान अभ्यासक्रम विनामूल्य आयोजित केले जातात. (global vipassana pagoda)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.