महिनाभरात भटके विमुक्त समाजघटकांना दाखले द्या; Radhakrishna Vikhe Patil यांचे आदेश

265
महिनाभरात भटके विमुक्त समाजघटकांना दाखले द्या; Radhakrishna Vikhe Patil यांचे आदेश

भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिना भरात दाखले वाटप करा त्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दिले. त्याचवेळी कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. (Radhakrishna Vikhe Patil)

भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला सदर बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, महाआयटी विभागाच्या मुख्य व्यवस्थापक जयश्री भोज, त्याचबरोबर भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी आणि इतर पदाधिकारी यांच्यासह दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. (Radhakrishna Vikhe Patil)

(हेही वाचा – Jansanman Mahamelava: पराभव झाला तिथूनच विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; Ajit Pawar यांची बारामतीत जाहीर सभा)

शिबिरे राबवून दाखल्यांचे वाटप करावे

यावेळी महसूल मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. आधार कार्ड, शिधा पत्रिका, आयुष्यमान कार्ड, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्यासाठी भटक्या विमुक्त विकास परिषेदेच्या संयोजकांबरोबरच तालुका स्तरावर तहसीलदार, ग्रामसेवक यांनी काम करावे आणि प्राधान्याने महिनाभरात जास्तीत जास्त शिबिरे राबवून त्यांना दाखल्यांचे वाटप करावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सर्व विभागीय आयुक्तांनी दर आठवड्याला या संदर्भात बैठक घेऊन आढावा घेऊन आलेल्या अडचणी सोडवाव्यात आणि ३० ऑगस्ट पर्यंत ही मोहीम पूर्ण करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. (Radhakrishna Vikhe Patil)

त्यामुळे आता भटके विमुक्त समाजातील नागरिकांना मतदान कार्ड, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा अधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचा भटके विमुक्त समाजाचा असल्याचा दाखला, शहरी भागात नगरसेवकांचा व ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच यांचा रहिवाशी दाखला यापैकी कोणतेही एक कादगपत्र असल्यास आवश्यक असलेले दाखले मिळणार आहेत, अशी माहितीही विखे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सदर मोहिमेतून भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी संपुष्टात येतील आणि त्यांना मोठा दिसला मिळेल असाही विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. (Radhakrishna Vikhe Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.