Legislative Council Elections : काँग्रेसला आपल्या आमदारांवरही भरोसा नाय काय?

160
Legislative Council Elections : काँग्रेसला आपल्या आमदारांवरही भरोसा नाय काय?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एक उमेदवार आणि ३७ मते आहेत. तर एक उमेदवार निवडून आणण्यासाठी २३ मतांची आवश्यकता असूनही काँग्रेसने आपल्या उमेदवाराला २७ पहिल्या पसंतीची मते देण्याचे फर्मान काढल्याचे कळते. याचा आरजे मलिष्काच्या भाषेत सांगायचे तर ‘काँग्रेसला आपल्या आमदारांवरही भरोसा नाय काय?’ हे स्पष्ट दिसते. (Legislative Council Elections)

२७४ आमदार मतदान करणार

विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीकडून ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून २७४ आमदार मतदान करणार आहेत. (Legislative Council Elections)

(हेही वाचा – Market : मुंबईतील मंडईंमधील परवाना नुतनीकरणाच्या शुल्कवाढीला स्थगिती, पण भाडेवाढ ५० टक्के!)

मित्रांऐवजी सुरक्षित विजय

या निवडणुकीसाठी विधानसभेतल्या आमदारांकडून गुप्त मतदान पद्धतीद्वारे हे मतदान होणार आहे. या निवडणुकीत निर्धारित कोट्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनुसार उमेदवार निवडून येणार आहे. संबंधित आमदारांची संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. त्याप्रमाणे एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २३ किमान मतांची गरज असताना आणि मित्रपक्ष शिवसेना उबाठा १६ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे केवळ १३ आमदार असतानाही काँग्रेसने २३ च्या वरील मते मित्रांना देण्याऐवजी सुरक्षित विजयासाठी करण्यासाठी २७ आमदारांनी काँग्रेस उमेदवाराला मत द्यावे असे आदेश दिले. (Legislative Council Elections)

२०२२ चा अनुभव

२०२२ च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असताना दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे यावेळी काँग्रेसने सावध भूमिका घेत अधिक मते आपल्या उमेदवाराला कशी मिळतील यांची सोय केली. मात्र इतके करूनही प्रत्यक्षात निवडणुकीत काय होते, याचा अंदाज पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही येणार नाही. (Legislative Council Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.