- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने अलीकडे काही वर्षांत भारतीय प्रशिक्षक आणि सहाय्यकांच्या ताफ्यातही भारतीयच असावेत असं धोरण ठेवलं आहे. पण, गंभीरने फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नेदरलँड्सच्या रायन टेन ड्युसकाटेची (Ryan ten Doeschate) मागणी केली आहे. क्रिकबझ या वेबसाईटने त्याविषयीची बातमी दिली आहे. अंतिम निर्णय अर्थातच बीसीसीआयकडे असेल. गंभीर आणि ड्यूसकाटे यांचं जुनं नातं आहे. कोलकाता संघातही दोघांनी एकत्र काम केलं आहे. आता गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक होता तेव्हाही रायन टेन ड्युसकाटे तिथे सहाय्यक प्रशिक्षक होता. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच लष्करातील जवानाचा बनाव उघड!)
बीसीसीआय (BCCI) ड्युसकाटेच्या (Ryan ten Doeschate) नावाचा गांभीर्याने विचार करत आहे. पण, क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दीलिप हे पदावर कायम राहावेत असं बीसीसीआयचं ठाम मत आहे. गंभीरचा कोलकाता संघातील आणखी एक सहकारी अभिषेक नायरच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे. आणि ड्युसकाटे, नायर भारतीय संघाबरोबर आले तर त्यांना नेमकं काय पद दिलं जाईल, हे अजून ठरलेलं नाही. (Gautam Gambhir)
India is my identity and serving my country has been the greatest privilege of my life. I’m honoured to be back, albeit wearing a different hat. But my goal is the same as it has always been, to make every Indian proud. The men in blue shoulder the dreams of 1.4 billion Indians… pic.twitter.com/N5YyyrhXAI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
२०२४ च्या हंगामात अभिषेक नायर (Abhishek Nair) कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक होता. तर ड्युसकाटेही सहाय्यक प्रशिक्षक होता. आताही दोघांपैकी एकाला सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका मिळू शकते. गौतम गंभीर श्रींलका दौऱ्यापासून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सूत्र हाती घेणार आहे. या दौऱ्यापूर्वीच गंभीरच्या सपोर्ट स्टाफची निवड केली जाईल. (Gautam Gambhir)
(हेही वाचा- Gautam Gambhir : माजी खेळाडूंनी केलं गंभीरच्या नियुक्तीचं स्वागत )
गंबीरने सूचवलेल्या नावांवर सध्या चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय हा बीसीसीआयच्या (BCCI) हातात असणार आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community