राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन, महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.
अशी आहे आकडेवारी
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासूनच देशात आघाडीवर आहे. त्यामध्ये राज्याने सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 46 लाख 81 हजार 465 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.8 जून 2021 रोजी 2,67,404 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/VZ18t8FDC8
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 9, 2021
(हेही वाचाः कोणतेही ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार? उच्च न्यायालयाकडून विचारणा )
ही राज्येही शर्यतीत
महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे लसीकरण पार पडले आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये देखील १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
Join Our WhatsApp Community