Ravi Bishnoi Catch : रवी बिश्नोईच्या हवेत सूर मारून टिपलेल्या झेलची सोशल मीडियावर चर्चा 

270
Ravi Bishnoi Catch : रवी बिश्नोईच्या हवेत सूर मारून टिपलेल्या झेलची सोशल मीडियावर चर्चा 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाने झिंबाब्वेविरुद्धचा तिसरा टी-२० सामना २३ धावांनी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) कामगिरीची चर्चा झाली तशीच चर्चा रवी बिश्नोईच्या (Ravi Bishnoi Catch) एका झेलाचीही सुरू आहे. पॉइंटला उभ्या असलेल्या बिश्नोईने (Ravi Bishnoi Catch) बेनेटला बाद करताना अचूक अंदाजाने पकडलेला हा झेल आहे.

(हेही वाचा- Har Ghar Nal Yojana 2024 : ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध)

भारताच्या १८२ धावांचा पाठलाग करताना झिंबाब्वेनं पहिले दोन गडी स्वस्तात गमावले होते. इतक्यात ब्रायन बेनेटने आवेश खानचा एक चेंडू त्वेषाने कट केला. हा जोरकस मारलेला फटका वाऱ्याच्या वेगाने जात होता. पॉइंटला उभ्या असणाऱ्या रवी बिश्नोईला तो दिसू शकला की नाही, कुणास ठाऊक, इतका चेंडूचा वेग होता. पण, हवेत सूर मारून रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi Catch) तो अचूक पकडला. झेल पूर्ण झाल्यावर संघातील सहकारीही त्याच्याकडे अविश्वासाने पाहात होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही ट्विटरवर हा व्हीडिओ शेअर करताना झेलाची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सशी केली आहे. झिम्बाब्वेची (Zimbabwe) अवस्था त्यामुळे ३ बाद १७ अशी झाली. या धक्क्यातून त्यांचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. डायो मायर्सने ४९ चेंडूंत ६६ धावा करत झिम्बाब्वेसाठी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची लढत अपुरी ठरली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने १५ धावांत ३ बळी मिळवले. (Ravi Bishnoi Catch)

 भारतीय संघाने आता मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेनं भारताचा १३ धावांनी धक्कादायक पराभव केला होता. आता चौथा टी-२० सामना शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर होईल. (Ravi Bishnoi Catch)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.