Kalyan Dombivli पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई!

117
Kalyan Dombivli पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई!
Kalyan Dombivli पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई!

कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) पालिका हद्दीत म्हैसवर्गातील जनावरांचे बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेच्या बाजार शुल्क आणि परवाना विभागाने कारवाई केली आहे. या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे दुकान विक्रीचे गाळे पालिकेकडून बंद करण्यात आले आहेत.

अचानक छापे टाकून बेकायदा मांस विक्रेत्यांवर कारवाई

पालिका (Kalyan Dombivli) हद्दीत मांस विक्री करताना पालिकेच्या बाजार शुल्क विभागाचा परवाना घेणे आवश्यक असते. पालिका हद्दीत अनेक ठिकाणी म्हैसवर्ग जातीमधील जनावरांचे मांस बेकायदा उघड्यावर विकले जात असल्याच्या तक्रारी पालिकेच्या बाजार शुल्क परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे वाढत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार शुल्क परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, निरीक्षक प्रांजल बागडे, प्रशांत धिवर, सज्जाउद्दीन पिरजादे, पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे, के. पी. कांगडे यांच्या पथकाने कल्याण शहराच्या तक्रारप्राप्त विविध भागात अचानक छापे टाकून बेकायदा मांस विक्रेत्यांवर कारवाई केली.

पाच किलो मांस जप्त

विठ्ठलवाडी येथील विनायक काॅलनी वसाहतीत शौकत कुरेशी आणि त्यांचे सहकारी अवैध मांस विक्री करत होते. त्यांच्या दुकानातून १० किलो म्हैसवर्ग जातीचे मांस जप्त केले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कुरेशी यांचा गाळा पालिका अधिकाऱ्यांनी बंंद (सील) केला. बेकायदा मांस विक्रीबद्दल यापूर्वीही कुरेशी यांचा मांस विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता, असे बाजार परवाना विभागाच्या अभिलेखातून उघडकीला आले आहे. नेतिवली भागातील रामनगर खदान टेकडी भागात पालिकेचे पथक पोहोचताच दुकानदाराने गाळा बंद करून तेथून पळ काढला. पत्रीपुलाजवळील मेट्रो माॅलसमोरील गफूल डोन शाळेजवळ युसुफ गौसु शेख यांच्या दुकानातून पथकाने पाच किलो मांस जप्त केले. त्याचेही दुकान पालिकेकडून बंद करण्यात आले. ही कारवाई यापुढे अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी सांगितले. (Kalyan Dombivli)

महापालिका अधिनियमाप्रमाणे पालिका हद्दीत मांंस विक्री करण्यापूर्वी पालिकेकडून परवाना घेणे आवश्यक आहे. जे विक्रेते परवाना नसताना अवैध मार्गाने मांंस विक्री करत आहेत, त्यांंच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा मार्गाने मांस विक्री करण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी करू नये. – प्रसाद ठाकूर, साहाय्यक आयुक्त, बाजार परवाना शुल्क विभाग. (Kalyan Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.