- ऋजुता लुकतुके
ब्रायन लारा (Brian Lara) खेळत होता तेव्हा गोलंदाजांची झोप उडवणारा फलंदाज अशी त्याची ख्याती होती. कारण, जम बसला की तो लवकर बाद व्हायचा नाही. बाद झाला नाही तर एका डावातच खोऱ्याने धावा करायचा, इतका त्याचा धावांचा वेगही जबरदस्त होता. म्हणूनच फलंदाजीतील त्याचा एक विक्रम मागची २० वर्ष अबाधित आहे. २००४ साली अँटिग्वा मैदानावर त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना एका डावात ४०० धावा केल्या होत्या. (Brian Lara on Record)
सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येच्या या विक्रमाच्या कुणी जवळही गेलेलं नाही. ३५० च्या वर धावा त्याने एकदा नाही तर दोनदा केल्या आहेत. आधी सर गॅरी सोबर्स यांचा ३६५ धावांचा विक्रम मोडताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ३७५ धावा केल्या होत्या. आणि हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने मोडून ३८० धावा रचल्यावर दुसऱ्याच वर्षी लाराने चक्क वैयक्तिक ४०० धावा पूर्ण केल्या. (Brian Lara on Record)
(हेही वाचा – Heavy Rain In Goa: गोव्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत)
ब्रायन लाराच्या मते ‘या’ चार खेळाडूंना मिळायला हवी संधी
या विक्रमाला आता २० वर्षं झाली आहेत. हा विक्रम कुणी मोडू शकेल का असा प्रश्न विचारल्यावर लाराने दोन भारतीय आणि दोन इंग्लिश फलंदाजांची नावं घेतली. ‘आताच्या घडीला इतके आक्रमक फलंदाज कोण आहेत? इंग्लंडकडे हॅरी ब्रूक आणि झॅक क्रॉली आहेत. तर भारताकडे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल आहेत. बाकी एकाच डावात ४०० धावा करणं हे वेळेअभावीही शक्य नाही. या चार खेळाडूंना तशी संधी मिळाली तर ते चारशेपार जाऊ शकतील,’ असं ब्रायन लाराने बोलून दाखवलं. (Brian Lara on Record)
गिल आणि यशस्वी हे भारतीय संघातील दोन युवा फलंदाज आहेत आणि त्यांची धावांची भूक सातत्याने वाढती आहे. शुभमनला यशस्वीच्या आधी भारतीय संघात स्थान मिळालं. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे ती १२८. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३२ च्या सरासरीने १,४९२ धावा केल्या आहेत. तर यशस्वी फक्त ९ कसोटी खेळलाय आणि यात त्याने २ द्विशतकांसह एकूण ३ शतकं ठोकली आहेत. कसोटींत ३ शतकं आणि ४ अर्धशतकांसह त्याच्या नावावर १,०२८ धावा जमा आहेत. (Brian Lara on Record)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community