आमदार Meghna Bordikar यांनी फाईलमध्ये ठेवले पैसे; व्हिडिओ व्हायरल होताच सभागृहात चर्चा

अधिवेशनाच्या वेळी Meghna Bordikar यांनी फाईलमध्ये पैसे ठेवले. आता बोर्डीकरांनी या फाईलमध्ये पैसे का ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

176
आमदार Meghna Bordikar यांनी फाईलमध्ये ठेवले पैसे; व्हिडिओ व्हायरल होताच सभागृहात चर्चा
आमदार Meghna Bordikar यांनी फाईलमध्ये ठेवले पैसे; व्हिडिओ व्हायरल होताच सभागृहात चर्चा

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा १२ जुलै हा शेवटचा दिवस आहे. या वेळी सभागृहातून भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अधिवेशनाच्या वेळी बोर्डीकरांनी फाईलमध्ये पैसे ठेवले. आता बोर्डीकरांनी या फाईलमध्ये पैसे का ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सभागृहात या वेळी झालेल्या चर्चेत मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले.

मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, मला ताप असल्याने सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे व्हिडिओ ?

12 जुलै रोजी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अधिवेशनाच्या वेळी बोर्डीकरांनी फाईलमध्ये पैसे ठेवले. त्यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. भाजप आमदार राजेश पवार हे विधानसभेत बोलत होते. तेव्हा मागे बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर या फाईल चेक करत होत्या. तेव्हा या फाईलमध्ये त्यांनी पैसे ठेवले आणि फाईल बंद करून ठेवली.

भाजप आमदाराने उपस्थित केला मुद्दा

याबाबत सभागृहात भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुद्दा उपस्थित करत या व्हिडिओचे प्रसारण तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियावर सकाळपासून त्यांचा फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा चुकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र सकाळपासून त्यांना ताप असल्याने त्यांनी पीएला औषधे आणण्यासाठी पैसे दिले. तसेच पैसे पैसे असे म्हंटले जात होते. मात्र ती केवळ हजार रुपयांची रक्कम होती”, असे राम कदम म्हणाले.

खातरजमा केली पाहिजे – बोर्डीकर

सोशल मीडियावर असा व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी नेमके कशासाठी मी पैसे काढले, याची खातरजमा केली पाहिजे. मला ताप असल्याने मी पीएकडे देण्यासाठी पैसे काढले असे त्या म्हणाल्या.सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, असे मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) म्हणाल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.