Paris Olympic 2024 : गोल्फपटू अदिती अशोक यावेळी पदक जिंकेल असा कपिल देव यांना विश्वास

Paris Olympic 2024 : टोकयो ऑलिम्पिकमध्ये अदितीचं पदक थोडक्यात हुकलं होतं.

98
Paris Olympic 2024 : गोल्फपटू अदिती अशोक यावेळी पदक जिंकेल असा कपिल देव यांना विश्वास
  • ऋजुता लुकतुके

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू अदिती अशोक चौथी आली होती. पण, शेवटच्या टप्प्यापर्यंत ती पदकाच्या शर्यतीत होती. तिच्या कामगिरीने तिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कांस्य पदक विजेत्या लिडिया कोपेक्षा फक्त एका फटक्याने ती मागे होती आणि सुवर्ण विजेत्या नेली कोर्डापेक्षाही फक्त दोन फटक्यांनी दूर. तेव्हा २३ वर्षांची असलेली अदिती आता २७ वर्षांची अनुभवी गोल्फपटू झाली आहे. म्हणूनच खेळातही परिपक्व असलेली अदिती अशोक यंदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकते, असं स्वत; व्यावसायिक गोल्फ खेळणारे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना वाटतंय. (Paris Olympic 2024)

‘मला अदितीमध्ये टोकयोत दिसलेला उत्साह पाहायचा आहे. तो तिच्या खेळात जिंकला तर ती यावेळी पदक नक्की जिंकू शकेल. क्रिकेट प्रमाणेच गोल्फमध्येही फॉर्म महत्त्वाचा असतो. तो सुरुवातीला सापडला तर अदितीकडे कौशल्य नक्कीच आहे. टोकयोत दाखवलेला फॉर्म ती पुन्हा दाखवू शकली, तर पदक तिचंच आहे,’ असं कपिल देव यांना वाटतं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – राज्यातील लहान मुले अन् विद्यार्थ्यांना घातक एनर्जी ड्रिंक्सचा विळखा – MLC Satyajeet Tambe यांनी सभागृहात उपस्थित केला मुद्दा)

गोल्फमध्ये सुधारणेला वाव – कपिल देव

कपिल देव भारतीय क्रिकेट संघातील ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू होते. १९८३ चा एकदिवसीय विश्वचषक भारताने त्यांच्या कप्तानीखालीच जिंकला आहे. पण, क्रिकेटमध्ये देशातील सुविधा सुधारल्या असल्या तरी गोल्फमध्ये सुधारणेला वाव आहे, असं कपिल यांना वाटतं. ‘भारतात पुरेशी गोल्फ मैदानं नाहीत. शिवाय आहेत त्या मैदानांमध्ये सुविधा नाहीत. स्पर्धांची संख्याही कमी आहे. ही परिस्थिती बदलली तर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकतील.’ असं कपिल देव म्हणाले. (Paris Olympic 2024)

गोल्फ हा व्यावसायिक खेळ असल्यामुळे खेळाडूंना सुविधांवर पैसे खर्च करावे लागतात. क्रिकेटसारखी नियामक मंडळांकडून खेळाडूंना मदत मिळत नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. भारतात गोल्फ स्पर्धा भरवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. (Paris Olympic 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.