२५ जून Samvidhaan Hatya Diwas म्हणून घोषित; सरकारने काढली अधिसूचना

155
२५ जून Samvidhaan Hatya Diwas म्हणून घोषित; सरकारने काढली अधिसूचना
२५ जून Samvidhaan Hatya Diwas म्हणून घोषित; सरकारने काढली अधिसूचना

२५ जून 1975 या दिवशी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 21 महिन्यांसाठी आणीबाणी (Emergency) लागू केली होती. यंदा आणीबाणीला ४९ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने केंद्रातील भाजप सरकारने २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. याविषयी सरकारने राजपत्रात अधिसूचनाही जारी केली. (Samvidhaan Hatya Diwas)

(हेही वाचा – KEM Hospital मध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी; अवघ्या ८ लाख रुपयांत पार पडलं ऑपरेशन)

या निर्णयाची माहिती देताना शहा यांनी लिहिले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा दाबला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला.

भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ (constitution killing day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश हुकूमशाही सरकारच्या असंख्य यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.

काय आहे आणीबाणीचा इतिहास ?

25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. यानंतर इंदिराजींनी रेडिओद्वारे आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीची मुळे 1971 च्या लोकसभा निवडणुकीत होती, जेव्हा इंदिराजींनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांचा रायबरेलीच्या जागेवर एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. पण राजनारायण यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली.

12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाने इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली. 23 जून 1975 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती दिली नाही आणि इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी राहू दिले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. (Samvidhaan Hatya Diwas)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.