जातीपातीच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्री Nitin Gadkari संतप्त; म्हणाले…

209
गणेशभक्तांचा कोकण प्रवास करणार खड्डेमुक्त; Nitin Gadkari यांचे वायकरांना आश्वासन

महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून राजकीय क्षेत्रात जातीपातीचं राजकारण (Caste politics) चालू आहे. यामध्ये अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडनुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेत आहे. दरम्यान जातीपातीच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.  (Nitin Gadkari)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, यावेळी त्यांनी, महाराष्ट्रामध्ये सध्या जातिपातीचं राजकारण होत आहे. “मी जात-पात मानत नाही. जो जातिपातीची बात करेल, त्याच्यावर मी सणसणीत लाथ मारेन,” असा इशाराच नितीन गडकरी यांनी दिला. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – KEM Hospital मध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी; अवघ्या ८ लाख रुपयांत पार पडलं ऑपरेशन)

उपस्थित कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, माझ्या नागपूर मतदार मतदारसंघात ४० टक्के मुसलमान आहेत. मी त्यांना आधीच सांगितलं की, मी आरएसएसचा (RSS) माणूस आहे. मी हाफ चड्डीवाला आहे. कुणालाही मत देण्यापूर्वी नंतर आपल्याला पुढे पश्चाताप होणार नाही याचा विचार केला पाहिजे. जो मला मतदान करेल त्याचं मी काम करणार आणि जो मत देणार नाही त्याचंही काम करणार, असे गडकरी यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – राज्यातील लहान मुले अन् विद्यार्थ्यांना घातक एनर्जी ड्रिंक्सचा विळखा – MLC Satyajeet Tambe यांनी सभागृहात उपस्थित केला मुद्दा)

दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीपातीचं राजकारण कमालीचRSS तीव्र झालेलं आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार असून, राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण अनेक उलथापालथींमुळे गाजत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कसा कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.  (Nitin Gadkari)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.