प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा; Monsoon Session चे सूप वाजले

194
प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा; Monsoon Session चे सूप वाजले
प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा; Monsoon Session चे सूप वाजले

महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. (Monsoon Session)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : गोल्फपटू अदिती अशोक यावेळी पदक जिंकेल असा कपिल देव यांना विश्वास)

विधान परिषदेचे कामकाज संस्थगित

विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.ही घोषणा उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी विधान परिषदेत केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. २७ जून ते दि. १२ जुलै, २०२४ या दरम्यान अधिवेशनाच्या  कामकाजात एकूण बैठकींची संख्या १३, प्रत्यक्षात झालेले कामकाज ६० तास, २६ मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज ४ तास ३८ मिनिटे, अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ ६ तास १० मिनिटे, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय  ०४ सदस्य,  अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले ०२, शोक प्रस्ताव ५, अभिनंदनपर प्रस्ताव १, तारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १४९४, स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या ४२८, उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या ५५ अशी होती.

विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८८.४८  टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ६७.७८ टक्के इतकी होती. विधानसभेत पुर्न:स्थापित १० शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी ८ विधेयके संमत झाली.  तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ४ असून ४ सूचना मान्य करण्यात आल्या. (Monsoon Session)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.