Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषदेच्या निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “जे लोक म्हणत होते आमच्या जागा…”

269
Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषदेच्या निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले
Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषदेच्या निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले "जे लोक म्हणत होते आमच्या जागा…”

विधानपरिषद निवडनुक (Legislative Council Elections) महायुतीसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असून शुक्रवार (१२ जुलै) रोजी विधानपरिषदेची निवडणूक झाली. यावेळी विधानपरिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election Result 2024) गुप्त पद्धतीने मतदान झाले असून, सायंकाळी विधानपरिषदेचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  (Vidhan Parishad Election Result 2024)

(हेही वाचा – Vidhan Parishad Election Result 2024: सुधीर मुनगंटीवार म्हणतात; “ससा-कासवाच्या शर्यतीत एकदा कासव जिंकलं म्हणून…”)

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, महायुतीने जेव्हा ९ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील, महाविकास आघाडीचे उमेदवार येतील, असे सांगित होते. मात्र शुक्रवारी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळत आहे की, आम्हाला आमची मते तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मते देखील आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला मिळाला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदनही केले.

(हेही वाचा – Heavy Rain : शीव, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्याला जबाबदार कोण?)

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा (Pankaja Munde) ताई देखील निवडून आल्या आहेत. आमचे सर्व निवडून आलेले उमेदवार बघितले तर, सर्वसामान्य घरातील, सर्व समाजातील आणि सामान्य माणसांत काम करणारे आमचे उमेदवार आहेत. मी सर्व मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले.” असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच “मला विश्वास आहे की, ही जी सुरुवात झाली आहे, विधानसभेच्या निवडणुकीतही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल, असा विश्वास मी व्यक्त करतो,” असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Vidhan Parishad Election Result 2024)

सदाभाऊ खोत यांचा मोठा विजय 

“सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हा जनतेचा माणूस आहे, शेतकऱ्यांचा नेता आहे. जनतेसाठी २४ तास राबणारा नेता आहे, त्यामुळे निश्चितपणे आमच्या महायुतीच्या आमदारांनी तर त्यांच्यावर विश्वास दाखवलाच, पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना एकूण २६.५ मते मिळाली आहेत. त्यामुळे एक मोठा विजय त्यांना मिळाला आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.