Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक, चौघांचा मृत्यू

174
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक, चौघांचा मृत्यू
Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक, चौघांचा मृत्यू

नाशिकमध्ये आडगावजवळ आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात (Nashik Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात नवीन सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आयशरचालक विरुद्ध दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ब्रेझा कारने समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

घराकडे परतत असताना ही भीषण दुर्घटना

रहेमान सुलेमान तांबोळी (४८) त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (२१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू पठाण (३८,रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (२४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहीती आडगाव पोलिसांनी दिली. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. (Nashik Accident)

कारचा चक्काचूर…

मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे खत वाहतूक करणारी आयशर ट्रक शुक्रवारी (दि.१३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मद्यपी चालक सुसाट चालवत होता. याचवेळी ट्रक चा एक टायर फुटला अन चालकाचा ताबा सुटला. ट्रक (एम.एच.15 जीव्ही 9190) दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रेझा कारवर (एम.एच 05 डीएच 9367) आदळला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत. (Nashik Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.