पाकिस्तानमध्ये मोहरमूल हरामदरम्यान दहशतवादी हल्ला (Terrorists Attack in Pakistan) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत एआरवायच्या अहवालानुसार, हिंदूस्तान टाइम्सने वृत्त दिलं आहे. कराचीचे पोलीस उप अधीक्षक, तारिक इस्लाम यांनी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अतिक्रमण विरोधी पोलीस कर्मचाऱ्यांना अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोहरमूल हराम दरम्यान कर्तव्यावर एकटे न जाण्याचंही आवाहन केलं आहे. (Terrorists Attack in Pakistan)
(हेही वाचा –Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा! मध्य-हार्बरवर होणार खोळंबा)
मोहरम दरम्यान कराचीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशाराही या अधिसूचनेत देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना अधिकृत असाइनमेंटसाठी पोलीस व्हॅनचा वापर करण्याचे आणि ड्युटी संपवून घरी परतताना गणवेश आणि बूट घालणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले होते. सिंध, बलुचिस्तान, खैबर-पख्तुनख्वा, इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, सरकारने मोहरम महिन्यात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देशभरात सशस्त्र दल तैनात करण्यास मान्यता दिली. (Terrorists Attack in Pakistan)
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिपब्लिकच्या विविध क्षेत्रांमध्ये सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंजाबमधील ५०२ ठिकाणे ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून निवडली गेली आहेत. ज्यामुळे सैन्य आणि रेंजर्सचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिया मुस्लिमांमध्ये मोहरमला खूप महत्त्व आहे. परंतु, या काळात सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये पाकिस्तानला वारंवार सांप्रदायिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. (Terrorists Attack in Pakistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community