पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. आयएएस पूजा खेडकर यांचं वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
व्हिडीओ व्हायरल
आता पुजा खेडेकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या मुळशी भागात एका गावकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावताना दिसत आहे…जमीन खरेदी प्रकरण आहे pic.twitter.com/QyqpX6riDk
— Rahul Kulkarni (@RahulAsks) July 12, 2024
मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याविरोधात पौड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (IAS Pooja Khedkar)
आईसोबत वडिलांचंही FIR मध्ये नाव!
पौड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मनोरमा खेडकर, त्यांचे पती व पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व इतर चार जणांची नावं आहेत. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. मनोरमा खेडकर यांनी धमकावल्याची तक्रार काही स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून त्यात कलम ३२३, ५०४. ५०६ नुसार नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रास्र कायद्याची कलमंही समाविष्ट करण्यात आल्याची माहिती पौड पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली. (IAS Pooja Khedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community