Prakash Industries Share Price : प्रकाश इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची उसळी

Prakash Industries Share Price : कंपनीला भाकरपारा कोळसा खाणीचं कंत्राट मिळालं आहे

254
Prakash Industries Share Price : प्रकाश इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची उसळी
Prakash Industries Share Price : प्रकाश इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची उसळी
  • ऋजुता लुकतुके 

प्रकाश इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये (Prakash Industries Share Price) ७.९९ टक्क्यांची वाढ होऊन शुक्रवारी बाजार संपताना कंपनीचा शेअर २०८.९५ वर बंद झाला. कंपनीला छत्तीसगड इथं भाकरपारा कोळसा खाणीत उत्खननाची परवानगी मिळाली आहे. गुरुवारी उशिरा कंपनीने तशी घोषणा करून शेअर बाजारातही ही बातमी कळवल्यावर त्याचा परिणाम शुक्रवारी शेअरवर दिसून आला. (Prakash Industries Share Price)

(हेही वाचा- IAS Pooja Khedkar यांच्या आईच्या अडचणी वाढणार? आईविरोधात ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल)

ऑगस्ट २०२३ मध्ये कंपनीला या खाणीचं प्राथमिक कंत्राट मिळालं होतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची परवानगी वन अधिनियम १९८० कायद्या अंतर्गत कंपनीला आता मिळाली आहे. या खाणीतील कोळशाचा व्यावसायिक वापर होणार आहे. ‘छत्तीसगड सरकारच्या पर्यावरण संवर्धन बोर्डाची परवानगी या खाणीसाठी पूर्वीच कंपनीला मिळाली होती. आता तिथे खाण विकासाचं काम जोरात सुरू झालं आहे. पुढील महिन्यात खाणीसाठीचं लीझही मिळेल,’ असं कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. (Prakash Industries Share Price)

या बातमीनंतर शेअर बाजारात शेअरवर सकारात्मक परिणाम दिसून आला.

Untitled design 2024 07 13T104412.230

या खाणीतून कोळसा उत्खनन सुरू झालं की, कंपनीच्या पोलाद उद्योगावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आणि कंपनीचा उत्पादन खर्च कमी होईल, असं कंपनीने म्हटलं आहे. प्रकाश कंपनीने २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत ८९० कोटी रुपयांची एकूण विक्री केली आहे. मार्च २०२३ च्या तुलनेत ही विक्री ११ टक्क्यांनी कमी होती. पण, २०२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ८८ कोटी रुपये निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. (Prakash Industries Share Price)

(हेही वाचा- Terrorists Attack in Pakistan : पाकिस्तान घाबरलं! दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानमध्ये पोलिसांनाच दिल्या ‘या’ सूचना)

या स्मॉलकॅप कंपनीचं बाजारातील भागभांडवल ३,५८१ कोटी रुपये इतकं आहे. सुर्या रोशनी समुहातील ही एक कंपनी असून कोळसा, लोह, ऊर्जा आणि पोलाद उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. (Prakash Industries Share Price)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.