Mumbai Rain: घराबाहेर पडणं टाळा! पुढचे 36 तास महत्वाचे, हवामान विभागानं दिला इशारा

858
Mumbai Rain: घराबाहेर पडणं टाळा! पुढचे 36 तास महत्वाचे, हवामान विभागानं दिला इशारा
Mumbai Rain: घराबाहेर पडणं टाळा! पुढचे 36 तास महत्वाचे, हवामान विभागानं दिला इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास (Mumbai Rain) महत्वाचे आहेत. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. पुढील 36 तासात मुंबईत 200 मिमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे खाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. (Mumbai Rain)

कुठे ऑरेंज अलर्ट ?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागानं वर्तवली आहे. (Mumbai Rain)

मुंबईला कोणता अलर्ट ?

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात देखील झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अंधेर सबवे खाली तीन चार फुट पाणी साचलं आहे. त्यामुळं तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज मुंबईसह ठाणे आणि पालघरला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.