Saina vs Angkrish : सायनावर केलेलं ट्विट अंगक्रिश रघुवंशीने घेतलं मागे, माफीही मागितली

Saina vs Angkrish : जसप्रीत बुमराचा उल्लेख करत केलेलं ट्विट अंगक्रिशने डिलिट केलं आहे.

129
Saina vs Angkrish : सायनावर केलेलं ट्विट अंगक्रिश रघुवंशीने घेतलं मागे, माफीही मागितली
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटपटू आणि इतर खेळांतील आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना देशात मिळणाऱ्या वागणुकीवर बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केलेल्या वक्तव्याची चेष्टा करणारं एक ट्विट आयपीएल खेळाडू अंगक्रिश रघुवंशीने केलं होतं. ते आता त्याने डिलिट केलं आहे. रघुवंशी २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला. त्याने यंदा चमकदार कामगिरी करताना १५५ च्या स्ट्राईकरेटने १६६ धावा केल्या. (Saina vs Angkrish)

काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनमधील स्टार खेळाडू सायना नेहवालने एका मुलाखतीत क्रिकेटपटू आणि इतर खेळांतील खेळाडूंची तुलना केली होती. ‘देशातील क्रीडा रसिकांनी क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंचं कौतुक करताना क्रिकेटपटूंना झुकतं माप देऊ नये. खरंतर बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस या खेळांमध्ये खेळाडूचा जास्त कस लागतो. शारीरिक ताकद दाखवायची असेल तर इतर खेळच शारीरिकदृष्ट्या जास्त कठीण आहेत,’ असं सायना एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाली होती. (Saina vs Angkrish)

‘मला, नीरज चोप्राला, कुस्तीपटू आणि मुष्टीयोद्ध्यांनाही देशात लोक ओळखतात तेव्हा बरं वाटतं. आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी केली तेव्हा लोक आम्हाला ओळखायला लागले. आमची नावं वर्तमानपत्रांतून झळकली. या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. कारण, ज्या देशात पुरेशी क्रीडा संस्कृती नाही, तिथे आम्ही हे करून दाखवलं,’ असंही सायना या कार्यक्रमात म्हणाली होती. (Saina vs Angkrish)

(हेही वाचा – Gautam Gambhir : सततचं क्रिकेट आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर नवीन प्रशिक्षक काय म्हणतात?)

सायनाच्या या वक्तव्यावर कोलकाता संघातील अंगक्रिश रघुवंशीने ट्विटकरून त्यात सायनाला उत्तर दिलं होतं. ‘जसप्रीत बुमराचे चेंडू ताशी १५० किमी वेगाने सायनाच्या डोक्याजवळून जायला लागले, तर सायनाला काय समजायचं ते समजेल,’ असं अंगक्रिशने ट्विटमध्ये लिहिलं आहे. (Saina vs Angkrish)

पण, काही वेळातच रघुवंशीने हे ट्विट डिलिट केलं आहे आणि जाहीर माफीही मागितली आहे. ‘मी मस्करी म्हणून ते ट्विट लिहिलं होतं. पण, मागे वळून पाहता, माझा तो बालिशपणा होता, असं मला जाणवलं. म्हणून ते ट्विट मी डिलिट करत आहे. माझ्या चुकीसाठी मी जाहीरपणे माफी मागतो,’ असं अंगक्रिशने नवीन ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Saina vs Angkrish)

सायना काही असं वक्तव्य करणारी पहिली खेळाडू नाहीए. अलीकडेच टी-२० विश्वचषक विजेत्या खेळाडूंचा सत्कार मुंबई विधानसभेत झाल्यावर बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीनेही जाहीर टीका केली होती. थॉमस चषक जिंकल्यावर मला असं बक्षीस का नाही मिळालं, असं त्याने विचारलं होतं. (Saina vs Angkrish)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.