- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाकडे सध्या जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा आहे. तर अर्शदीप सिंग तयार होतोय. बुमरा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप असं त्रिकुट अंतिम अकरामध्ये भारतासाठी खेळतंय. पण, स्विंग आणि अचूकता यांचा अंदाज घेतला तर बुमरा आणि मोहम्मद शमी हे दोन जागतिक दर्जाचे खेळाडू भारतीय संघात आहेत. एकदिवसीय विश्वचषक गाजवल्यानंतर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त आहे. भारतीय संघ तसंच नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरसमोरचं ते पहिलं आव्हान असणार आहे. (Talk to Mohammed Shami)
मावळता गोलंदाजीचा प्रशिक्षक पारस म्हांब्रेनंही गंभीरला शमीला लवकरात लवकर संवाद करण्याचा सल्ला दिला आहे. ‘मोहम्मद शमी आता तरुण राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलून त्याच्या कारकीर्दीची पुढची दिशा ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तो कधीपर्यंत खेळू शकतो, त्याची इच्छा काय आहे, त्याच्या दुखापतीचं स्वरुप काय आहे, याचा आढावा घेऊन त्याला संघासाठी कसं वापरायचं याची रणनीती तयार करणं हे आता गंभीरला करावं लागेल,’ असं म्हांब्रेनं म्हटलं आहे. (Talk to Mohammed Shami)
(हेही वाचा – Anganwadi Nutrition: पंढरपुरातील घटना! अंगणवाडीतील खिचडीत आढळले मृत बेडकाचे पिल्लू)
शमीला कसोटी क्रिकेट खेळायचं असेल तर ऑस्ट्रेलियातील मालिकेत तो उपयोगी पडेल. पण, त्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटही त्याला खेळावं लागेल. या सगळ्याचं नियोजन त्याच्याबरोबर करणं ही गंभीर आणि त्याच्या सपोर्ट स्टाफची जबाबदारी असेल, असं म्हांब्रेला वाटतं. (Talk to Mohammed Shami)
येणाऱ्या एका वर्षात भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपदासाठी तयारी करणार आहे. त्यात शमीची भूमिकाही महत्त्वाची असेल. सध्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Talk to Mohammed Shami)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community