बोरीवलीतील (Borivali) बाभई स्मशानभूमी बंद करण्यात आल्याने यावरून जोरात वाद सुरु असून मागील अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आलेली स्मशानभूमी त्वरीत सुरु करण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या मिरा कामत यांनी इशारा दिला आहे. मिरा कामत यांनी महापालिकेचे विभाग कार्यालय, आमदार सुनील राणे यांचे कार्यालय आणि बोरीवली रेल्वे स्थानक आदी ठिकाणांचा पर्याय देऊन त्याठिकाणी याबाबत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. परंतु त्यांची परवानगी नाकारण्यात आल्याने येत्या १५ जुलैच्या आत बाभई स्मशानभूमी अंशत: सुरु न केल्यास आपण उपोषण करू अशाप्रकारचा इशाराच कामत यांनी दिला आहे. (Borivali)
बाभई स्मशानभूमीचे बांधकाम धोकादायक झाल्याने ही स्मशानभूमी बंद करण्यात आली. त्यामुळे येथील स्थानिकांना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत. याबाबत स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, मागील महिन्यांत या स्मशानभूमीच्या शेडचे बांधकाम आमदार सुनील राणे यांच्या निधीतून म्हाडाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. परंतु याठिकाणी काही स्थानिकांचा पुन्हा स्मशानभूमी करण्यास विरोध असून याजागी पारंपारिक चिता ऐवजी विद्युत दाहिनीची व्यवस्था केली जावी अशी मागणी होत आहे. तर गावातील रहिवाशांच्या मागणीनुसार, याठिकाणी विद्युत दाहिनी ऐवजी पारंपारिक पध्दतीनुसार लाकडाचा वापर करत चिता रचण्याचे बांधकाम केले जावे अशीही मागणी होत आहे. (Borivali)
(हेही वाचा – Anganwadi Nutrition: पंढरपुरातील घटना! अंगणवाडीतील खिचडीत आढळले मृत बेडकाचे पिल्लू)
कामत यांनी दिला ‘हा’ इशारा
काही रहिवाशांसाठी ही स्मशानभूमी बंद करण्याचा घाट घातला गेल असल्याने सामाजिक कार्यकर्त्या मिरा कामत यांनी या प्रकरणात लक्ष घालून बाभई स्मशानभूमी त्वरीत सुरु करण्याची मागणी करत ही स्मशानभूमी सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. स्मशानभूमीची जागा चोगले कुटुंबाने दिली होती. स्थानिकांना अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही स्मशानभूमी जर उभारली असेल तर ती पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे. त्यामुळे म्हाडाच्यावतीने याचे बांधकाम होत असले तरी आधी ही स्मशानभूमी कार्यरत करा, अशाप्रकारची मागणी कामत यांनी केली. (Borivali)
दरम्यान, महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, म्हाडाच्यावतीने बांधकाम सुरु असून हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्मशानभूमीचे बांधकाम केले जाईल. मात्र, याबाबत मिरा कामत यांनी उपोषणासाठी तीन जागांचा पर्याय दिल्यानंतर या उपोषणासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. याबाबत कामत यांनी खेद व्यक्त केला असून बोरीवली (Borivali) पश्चिम पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत झालेल्या कामाच्या प्रगतीबाबत महापालिकेकडून आढावा घेतला. तसेच अंत्यसंस्कारासाठी पियर बेडचे अंशिक कामकाज सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु पारंपारिक पद्धतीने या स्मशानभूमीत चिताचे बांधकाम हे निर्धरीत वेळेत म्हणजे १५ जुलै पर्यंत हे बांधकाम करावे असा इशारा कामत यांनी दिला आहे. त्यामुळे बाभई स्मशानभूमी येत्या १५ जुलैपर्यंत सुरु होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Borivali)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community