Sanjay Raut यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

152
Sanjay Raut यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करावा तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे) प्रवक्ते संजीव भोर यांनी केली. (Sanjay Raut)

हक्कभंग दाखल करावा

‘गद्दारांना गद्दारांनी निवडून आणले,’ असे म्हणत विधान परिषदेच्या निवडून आलेल्या ११ आमदारांचा आणि मतदान करणारऱ्या विधानसभेतील आमदारांचा संजय राऊत यांनी अवमान असल्याने त्यांच्यावर हक्कभंग दाखल करावा आणि फौजदारी कारवाई करावी, असे भोर म्हणाले. (Sanjay Raut)

(हेही वाचा – Sanjay Shirsat: ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, तो पागल माणूस…’ ‘त्या’ आरोपांवर शिरसाटांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर)

उमेदवार पडल्याचे शल्य

“शुक्रवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार उभे केले आणि निवडूनही आले. मात्र महाविकास आघाडीची मतं फुटली आणि त्यांचे तीन पैकी दोनच उमेदवार निवडून आले. हे शल्य बहुतेक संजय राऊतना पचवता आले नाही. म्हणूनच गद्दारांनी गद्दारांना निवडून आणले, असे आक्षेपार्ह वक्तव्य राऊत यांनी केले,” असे सांगून “या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो,” असे भोर म्हणाले. (Sanjay Raut)

संजय राऊत यांच्यावर निवडून आलेल्या आमदारांनी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. सातत्याने लोकशाहीविरोधी वक्तव्य करणाऱ्या राऊत यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी भोर पाटील यांनी केली आहे. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.