Diamond Exchange : भारतातील सर्वात मोठ्या हिरे एक्सचेंजचा आपल्याला नक्की काय फायदा होणार?

Diamond Exchange : पेंटागॉनपेक्षा आकाराने मोठं असलेलं सुरतचं हिरे एक्सचेंज.

139
Diamond Exchange : भारतातील सर्वात मोठ्या हिरे एक्सचेंजचा आपल्याला नक्की काय फायदा होणार?
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सुरत इथं जगातील सगळ्यात मोठ्या हिरे एक्सचेंजचं उद्घाटन केलं. आतापर्यंत ८,००० च्यावर हिरे व्यापारी सुरतमधील या एक्सचेंजमध्ये काम करायला लागले आहेत. आकाराने ही वास्तू पेंटागॉनपेक्षाही मोठी आहे. २२,००० किलोमीटर परिघाची ही एकूण जागा आहे. इथं १३० लिफ्ट आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाचं भारतासाठी या एक्सचेंजचा नेमका काय फायदा होणार आहे. तर जागतिक स्तरावर हिरे व्यापारात भारत आता लक्ष वेधून घेत आहे. भारतात खासकरून हिऱ्यांचं कटिंग आणि त्याला पैलू पाडणं हे काम होतं. बाकी हिरे बाहेरून आयात केले जातात. पण, भारतात हिरे व्यापाराची परंपरा मोठी आहे. १९३० च्या दशकापासून सुरत हे भारतीय हिरे व्यापाराचा मोठं केंद्र म्हणून समोर आलं आहे. (Diamond Exchange)

हिऱ्यांचं कटिंग आणि पॉलिशिंग करून हे हिरे जी७ देशांकडे मोठ्या प्रमाणावर पाठवले जातात. भारताची ४० टक्के हिरे निर्यात ही जी७ देशांना होते. त्या खालोखाल बेल्जिअल देश आपल्याकडून हिरे विकत घेतो. आता जी७ देशांनी रशियाकडून कच्चे तसंच तयार हिरे घेणं बंद करणार आहेत आणि त्याचा फायदा भारताला येत्या दिवसांत मिळेल, अशी आशा आहे. आता जागतिक एक्सचेंजमुळे सुरत जगभरातील व्यापाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो. ती प्रक्रिया सुरूही झाली आहे. त्यामुळे भारतात परकीय गुंतवणूक वाढेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर इथं ४०,००० च्या वर कार्यालयं असणार आहेत. त्यामुळे नोकऱ्यांची संख्याही वाढणार आहे आणि त्याचबरोबर देशाची हिरे निर्यातही हळू हळू वाढेल. (Diamond Exchange)

(हेही वाचा – मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य; PM Narendra Modi यांची घोषणा)

हिरे व्यापाऱ्यांसाठी हिरे एक्सचेंज हे एका जागेत सर्व कामं होतील असं केंद्र आहे. हिऱ्याशी संबंधित व्यापार एकाच जागी चालत असल्यामुळे हा समुदाय एकत्र एका छताखाली येतो, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. जागतिक स्तरावर एकाच एक्सचेंजमध्ये सगळा माल तयार होत असल्यामुळे सोपं जातं. बाहेरून भारतात आलेल्या लोकांचंही काम एकाच ठिकाणी होतं. शिवाय एक्सचेंजवर सरकारी नियंत्रण आहे. त्यामुळे इथल्या व्यवहारात आता जास्त पारदर्शकता अपेक्षित आहे. त्याचबरोबर ग्राहकांना एकाच केंद्रात विविध प्रकारचा माल एकत्र तपासून पाहता येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांना पर्याय आणि ते ही एकाच ठिकाणी मिळतात. (Diamond Exchange)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.