मुंबईत सध्या फेरीवाल्यांविरोधातील (Hawkers) कारवाई जोरात सुरु असून रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न सुरु असला तरी प्रत्यक्षात या कारवाईत शिथिलता असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या या कारवाईबाबत आता फेरीवाल्यांमध्ये कोणत्याही भीती राहिलेली नसून महापालिकेच्या सामान जप्त करणाऱ्या गाड्या समोर असतानाही फेरीवाले बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या केशवसुत उड्डाणपूल आणि डिसिल्व्हा मार्गावर तसेच जावळे मार्गावर अशाप्रकारे महापालिकेच्या गाड्या उभ्या असतानाही व्यवसाय करत असल्याने महापालिकेच्या कारवाई पकड ढिली झाली आहे का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (Hawkers)
मुंबई महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त करण्याच्या दृष्टीकोनात फेरीवाल्यांविरोधातील (Hawkers) कारवाई हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून असलेल्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येत नसून महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच चोरी छुपे व्यवसाय करण्याचा प्रयत्न फेरीवाल्यांकडून केला जात आहे. महापालिकेच्यावतीने ही कारवाई सुरु असली तरी प्रत्यक्षात रात्री ८ नंतर मात्र रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला जातो. दादर रेल्वे स्थानकांच्या परिसरातही रात्री ८ नंतरही गाडी उभी असतानाही फेरीवाले जागा अडवून बसत असतात. (Hawkers)
(हेही वाचा – कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट; Giriraj Singh यांचे प्रतिपादन)
महापालिकेची कारवाई नक्की कुठे सुरु?
मात्र, ही शनिवारी दिवसाही महापालिकेच्यावतीने काही ठिकाणी गाड्या उभ्या असतानाही या गाड्यांपासून दहा फुटांच्या अंतरावर फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखाली काही फेरीवाल्यांकडून व्यवसाय सुरु होता, तर डिसिल्वा रोड आणि जावळे मार्गावर दीडशे मीटरच्या परिसरातच मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत असताना पाहताना महापालिकेची कारवाई नक्की कुठे चालू आहे असा प्रश्न पडू लागला आहे. (Hawkers)
दादरमधील फेरीवाल्यांशी (Hawkers) संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना महापालिकेची गाडी समोर उभी आहे, आणि त्यांच्यासमोर धंदा करता, आपल्याला भीती नाही का वाटत, सामान पकडून नेण्याचा, यावर फेरीवाले म्हणतात, काय का डर, ओ लोग गाडी खडी करके निकल गये. उनको क्या डरना. उनको भी बार बार सामान लेके जानें को कंटाला आता आहे, उनको भी यह ऍक्शन नहीं करना है, असे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. (Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community