- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून आता नगर पथ विक्रेता समितीवर अर्थात टाऊन वेंडींग समितीवर आता फेरीवाल्यांचे प्रतिनिधींची निवड करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांमध्ये याबाबतच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता असून याबाबत पात्र मतदारांची यादी बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सात परिमंडळांमधून एक याप्रमाणे सात आणि अन्य एक याप्रमाणे आठ फेरीवाल्यांची निवडणूक प्रक्रियेतून निवड करण्यात येणार आहे. (Hawker Policy)
मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी सुमारे २२ हजार ४८ फेरीवाले मतदानास पात्र ठरले आहे. हे सर्व मतदार टाऊन वेंडींगवर आपले सदस्य निवडून पाठवणार आहे. त्यामुळे निवडून आलेले फेरीवाल्यांचे सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी अशाप्रकारची टाऊन वेंडींग समिती ही फेरीवाल्यांच्या पात्रतेबाबतच्या मार्गदर्शक सुचना तयार करणार आहे. या पात्र मतदार फेरीवाल्यांमधून प्रतिनिधींची निवड करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या माध्यमातून निवडणूक घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने कामगार आयुक्तलयाशी पाठपुरावा सुर आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जाहिरात प्रसिध्द केली जाईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Hawker Policy)
(हेही वाचा – MLA Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांचा सवाल; ‘विकली जाणारी गाढवे पाळायचीच कशाला?’)
फेरीवाले करणार मतदान
मुंबई महापालिकेच्याच्या संकेत स्थळावर पथ विक्रेता म्हणून सिध्दता पूर्ण करणाऱ्या फेरीवाल्यांची यादी यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये २०१४च्या सर्वेतील पात्रतेसाठी निश्चित केलेल्या २२ हजार ४८ फेरीवाल्यांसह परवानाधारक १०हजार३३० स्टॉल्सधारकांसह फेरीवाल्यांचा समावेश आहे. टाऊन वेंडींग कमिटीवर फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत या पात्र फेरीवाला मतदारांना मतदान करता येणार आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येक एक या जागेसाठी फेरीवाल्यांचे प्रतिनिधी उमेदवारी अर्ज भरु शकतात. या उमेदवार प्रतिनिधींमध्ये निवडणूक होईल आणि यातून प्रत्येक परिमंडळांमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराची टाऊन वेंडींग समितीवर प्रतिनिधी म्हणून निवड केली जाईल. (Hawker Policy)
फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींसह तयार झालेली टाऊन वेंडींग समिती ही फेरीवाल्यांच्या पात्रतेबाबतचे निकष तयार करतील. यामध्ये मतदार म्हणून भूमिका बजावणाऱ्या २२ हजार फेरीवाल्यांसाठी नवीन निकषाप्रमाणे पात्रता निश्चित केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. महापालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून नागरी पथ विक्रेता समितीवर प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यात पात्र मतदार फेरीवालेच मतदान करू शकतील. यात प्रत्येक परिमंडळांमध्ये जो उमेदवार निवडून येईल त्याची निवड या वेंडींग कमिटीवर केली जाईल. यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी कामगार आयुक्तांच्या माध्यमातून आठ दिवसांमध्ये जाहिरात सूचना निवडणूक प्रक्रियेबाबत प्रसिध्द केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Hawker Policy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community