Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न सोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी 

384
Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न सोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी 
Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न सोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी 

वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra – Kurla Complex) येथे शुक्रवारी पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न सोहळ्यात दोन संशयितांनी बेकायदेशीर प्रवेश (Anant Radhika Wedding Illegal Entry) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (१३ जुलै रोजी) उघडकीस आली आहे. येथील सुरक्षा रक्षकानी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी या दोघांविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. मोहम्मद शफी शेख (Mohammad Shafi Shaikh) (२८) आणि व्यंकटेश नरसैया अलुरी (Venkatesh Narsaiah Aluri) (२६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Anant-Radhika Wedding)

मोहम्मद शफी हा व्यवसायीक असून व्यंकटेश हा आंध्रप्रदेश राज्यातील युट्युबर आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा समारंभ मागील एक महिन्यापासून सुरू आहे. या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण जगभरात असून या सोहळ्यात देशातील आणि देशाबाहेरील कलाकार, बडे उद्योगपती, राजकारणी सामील होत होते, शुक्रवारी बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (Jio World Convention Center)  या ठिकाणी या शाही विवाह पार पडला, या सोहळ्यात बॉलिवूड मधील बडे कलाकार, तसेच जगभरातील उद्योगपती आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.

(हेही वाचा – अनंत-राधिका नवदाम्पत्याला PM Narendra Modi यांनीही दिले ‘शुभ आशीर्वाद’)

या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती, कडक सुरक्षा व्यवस्थेचे जाळे तोडून मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसैया अलुरी या दोघांनी  या विवाह सोहळ्यात सामील होण्यासाठी  जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान ही बाब येथील सुरक्षा रक्षकांच्या आणि अधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी या दोघांना हटकले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे समारंभाला बोलविण्यात आल्याचे कुठेलिही आमंत्रण पत्रिका नव्हती, दोघांकडे या ठिकाणी येण्याबाबतचे कारण  विचारले असता, व्यवसायिक असलेल्या शेख याने शाही विवाहसोहळा स्वतच्या डोळ्याने बघायचा होता, म्हणून आलो तर आंध्रप्रदेश राज्यातून आलेल्या युट्युबर असलेल्या व्यंकटेश याला हा सोहळा स्वतच्या कॅमेरात कैद करून तो त्याच्या युट्यूब चॅनल वर प्रसारित करायचा असल्यामुळे त्याने या सोहळ्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Ashadhi Wari 2024 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालतात ४ लाख वारकरी)

सुरक्षा रक्षकांनी या दोघांना बीकेसी पोलिसांच्या ताब्यात देवून तक्रार दाखल केली. बीकेसी पोलिसांनी  या दोघांविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. (Anant-Radhika Wedding)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.