शाळा, कॉलेजच्या परिसरातील Energy Drinks वर बंदी कारवाई; सरकारने घेतला मोठा निर्णय

104
शाळा, कॉलेजच्या परिसरातील Energy Drinks वर बंदी कारवाई; सरकारने घेतला मोठा निर्णय
शाळा, कॉलेजच्या परिसरातील Energy Drinks वर बंदी कारवाई; सरकारने घेतला मोठा निर्णय

एनर्जी ड्रिंकमध्ये असलेल्या घातक गुणधर्मामुळे अनेकदा ते आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. बाजारात अशा एनर्जी ड्रिंक्सची सर्रास विक्री केली जाते. शाळेबाहेर असलेल्या स्टॉलवर मुले मोठ्या प्रमाणात ही ड्रिंक्स पितात. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार डॉ. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील शाळा आणि कॉलेजच्या 500 मीटरच्या परिसरात खुल्या पद्धतीने कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सवर (Energy Drinks) बंदी घालण्यात येत आहे. याबाबतची घोषणा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Diamond Exchange : भारतातील सर्वात मोठ्या हिरे एक्सचेंजचा आपल्याला नक्की काय फायदा होणार?)

250 मिलीच्या बाटलीत 75 मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन

कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबत सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला होता. राज्यातील मुंबईसह नाशिक, तसेच शहरी आणि ग्रामीण भागात एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक्स विकले जातात. 250 मिलीच्या बाटलीत 75 मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन असल्यामुळे नशा येते. त्याचा मेंदू, किडणी, मज्जातंतू यावर विपरित परिणाम होऊ शकतो. याचाच परिणाम म्हणजे, अस्वस्थता, निद्रानाश, लठ्ठपणा असे आजार मागे लागू शकतात. त्यामुं शाळा आणि कॉलेजच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली होती.

500 मीटर अंतराच्या आत प्रतिबंध

यानंतर अन्न व प्रशासन मंत्री अत्राम यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नशा आणणाऱ्या अप्रमाणित एनर्जी ड्रिंक्स शाळा आणि कॉलेजच्या 500 मीटर अंतराच्या आत विकता येणार नाहीत, असे निर्देश दिले आहेत. अन्न पदार्थांमध्ये कॅफेन या घटक पदार्थांचे प्रमाण निश्चित केले आहे. हे तपासण्यासाठी नियमितपणे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले जातात. राज्यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 162 नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. त्यातील 53 प्रमाणित झाले आहेत. अप्रमाणित असलेला 1800 लीटर साठा पकडला आहे, असे अत्राम यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.