राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो (Priyank Kanungo) यांनी मदरशांतील शिक्षणाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मदरसे ही इस्लामी शिक्षण देणारी केंद्रे आहेत. हे शिक्षण अधिकार कायद्याच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे मदरशांमध्ये हिंदू, तसेच अन्य मुसलमानेतर मुलांनी शिक्षण घेणे, हे त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचे उल्लंघनच नव्हे, तर समाजात धार्मिक वैमनस्य पसरण्याचे कारण बनू शकते.
(हेही वाचा – Donald Trump shooting: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार; नेमकं काय घडलं?)
मदरशांपासून दूर रहाण्याचे आवाहन
उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यात असलेल्या देवबंद शहराजवळ एका गावात एका हिंदु मुलाचे बलपूर्वक धर्मांतर आणि सुंता केल्याच्या घटनेवर कानूनगो यांनी सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडलेल्या या घटनेविषयी १३ जुलै या दिवशी कानूनगो यांनी माहिती देतांना मुसलमानेतर मुलांना मदरशांपासून दूर रहाण्याचे आवाहन केले. या संदर्भात याआधीही कानूनगो यांनी राज्य सरकारांना विनंती केली होती की, मदरशांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुसलमानेतर विद्यार्थ्यांसाठी नियमित शाळांमध्ये पर्यायी व्यवस्था करावी. उत्तरप्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या शिफारशीनुसार आदेशही दिला होता.
कट्टरतावादी संघटनांच्या अफवांपासून दूर रहा
कानूनगो यासंदर्भात म्हणाले की, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ (Jamiat Ulema-e-Hind) नावाची इस्लामी संघटना या आदेशाविषयी लोकांची दिशाभूल करत असून सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे. मौलवींची ही संघटना ‘दारुल उलूम देवबंद’ची एक शाखा आहे. यावर आयोगाने ‘गझवा-ए-हिंद’ला (Ghazwa-e-Hind) पाठिंबा दिल्यावरून कारवाई केली आहे. कुणीही मुलांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे हनन करता कामा नये. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की, कट्टरतावादी संघटनांच्या अफवांपासून दूर रहा आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपला हातभार लावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community