शिव नादार (Shiv Nadar) हे एक भारतीय उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांचा जन्म १४ जुलै १९४५ साली एका तेलगू कुटुंबात झाला. ते एच.सी.एल. टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. व्यापारातलं त्यांचं प्रत्येक गोष्टीतलं नियोजन उल्लेखनीय आहे. शिव नादार (Shiv Nadar) यांची जगातल्या पाच देशांमध्ये शंभरपेक्षा जास्त कार्यालये आहेत. त्यांत तीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
(हेही पहा- ‘NASA’च्या माजी अंतराळवीराकडून भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले…)
शिव नादार (Shiv Nadar) यांनी जगभरातल्या संगणक व्यापारी आणि ग्राहकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे. २००८ साली शिव नादार यांच्या आय.आय.टी. च्या उद्योग क्षेत्रातल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. २०१० साली शिव नादार यांची वैयक्तिक संपत्ती ४.२ अब्ज यूएस डॉलर इतकी होती.
शिव नादार (Shiv Nadar) यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातल्या वालचंद ग्रुप कूपर इंजिनिअरिंग येथून केली. १९६७ साली त्यांनी आपल्या सोबतीला सात सहकारी घेऊन मायक्रोकॉप नावाच्या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर कालांतराने ती कंपनी त्यांनी टेलिडिजीटल कॅल्क्युलेटरला विकली.
(हेही पहा- World Championship of Legends final : टीम इंडियाने पाकिस्तानला धूतलं; ५ विकेट्सने फायनल जिंकली!)
१९७६ सालच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी एका गॅरेजमध्ये एच.सी.एल. इंटरप्राईझेसची सुरुवात केली. त्यानंतर १९९१ साली एच.सी.एल. ही नव्या टेक्नॉलॉजीसोबत मार्केटमध्ये उतरली. गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात नवनवीन टेक्नॉलॉजी कंपन्यांचा नुसता पूर आला आहे. पण या कंपन्यांच्या महापूरात एच.सी.एल’ या कंपनीचं स्थान अढळ राहिलं आहे.
शिव नादार (Shiv Nadar) यांनी आपली मायक्रोकॉप नावाची कंपनी विकली आणि त्या पैशांतून एच.सी.एल. या नव्या कंपनीची स्थापना केली. एच.सी.एल. कंपनीचं ८०% उत्पन्न कम्प्युटर आणि ऑफिसात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांमधून येतं.
(हेही पहा- Madrasa पासून दूर रहा; काय म्हणाले राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष Priyank Kanungo ?)
शिव नादार (Shiv Nadar) यांच्या व्यावसायिक साम्राज्यामुळे अर्थशास्त्र आणि राज्यकारभारासाठी व्यवसायाची एक नवीच व्याख्या तयार झाली आहे.
नादार म्हणतात, “गेल्या दोन-चार दशकांपासून मी पाहत होतो की आय.टी. इंडस्ट्री हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्व्हिसेस, सोल्युशन्स, नेटवर्किंग, कम्युनिकेशन, इंटरनेट आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राध्ये खूप विकास झाला आहे. या इंडस्ट्रीत आपलं कर्तृत्व दाखवण्याची भरपूर क्षमता आहे. मी वेळीच ही संधी ओळखली आणि म्हणून मी यशस्वी झालो.”
हेही वाचा-
Join Our WhatsApp Community