अमेरिकेचे माजी अध्यक्ष व अमेरिकेच्या यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी (१३ जुलै) पेन्सल्व्हेनिया येथे निवडणूक प्रचाराच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला.
Deeply concerned by the attack on my friend, former President Donald Trump. Strongly condemn the incident. Violence has no place in politics and democracies. Wish him speedy recovery.
Our thoughts and prayers are with the family of the deceased, those injured and the American…
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2024
प्रचारसभेत बोलत असताना बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. ही गोळी ट्रम्प यांच्या कानला चाटून गेली अन् ते खाली कोसळले. तसेच लोकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र ट्रम्प यांच्या अंगरक्षकांनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांना व्यासपीठाच्या मागे घेऊन गेले. त्यावेळी ट्रम्प यांच्या कानावरून रक्त ओघळत असल्याचं दिसत होतं. त्या स्थितीतही त्यांनी पुन्हा एकदा उभे राहून एक घोषणा दिली आणि ते तिथून निघून गेले. (Donald Trump)
पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?
ट्रम्प यांच्यावरील या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. या हल्ल्यावरून मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यासह “राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला थारा नाही.” अशा शब्दांत मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला. मोदी यांनी म्हटलं आहे की माझे मित्र व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राजकारण व लोकशाहीत हिंसेला थारा नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेन. आम्ही या हल्ल्यात निधन झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले अमेरिकन नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. (Donald Trump)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community