Poha Chivda : पोह्यांचा खमंग चिवडा कसा करावा ?

230
Poha Chivda : पोह्यांचा खमंग चिवडा कसा करावा ?
Poha Chivda : पोह्यांचा खमंग चिवडा कसा करावा ?

पोह्यांचा चिवडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि चविष्ट नाश्ता आहे. हलका, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा हा चिवडा दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने खास बनवला जातो. चला तर मग, आपण पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा, ते जाणून घेऊया. (Poha Chivda)

(हेही वाचा – Amravati Bus Accident: ब्रेक फेल झालेल्या बसने चौघांना चिरडलं; ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू)

लागणारे पदार्थ

1 किलो पातळ पोहे
1/2 पाव डाळ्या
1/2 पाव शेंगदाणे
1 वाटी खोबऱ्याचे काप
8 हिरव्या मिरची चे तुकडे
1 वाटी कढी पत्ता पाने
4 टेबलस्पून खसखस
2 टेबलस्पून धने पावडर
1 टेबलस्पून जीरे पावडर
4 टेबलस्पून तिखट
2 टेबलस्पून हळद
1 टीस्पून हिंग
1 टेबलस्पून मोहरी
3 टेबलस्पून साखर
1 वाटी तेल
स्वादानुसार मीठ

कृती
  • सर्वप्रथम पातळ पोहे दोन दिवस उन्हात ठेवा. आता दाणे व डाल्या निवडून घ्या. एका मोठ्या कढईत हे पोहे पुन्हा चांगले भाजून घ्या.
  • आता हे भाजलेले पोहे एका ताटात काढून घ्या. आता कढईमध्ये तेल टाका,मोहरी टाका व हिंग घाला.आता यात मिरच्या चे तुकडे शेंगदाणे दालवा घाला,कढी पत्त्या ची पाने घाला.
  • शेंगदाणे वडाळ्यात घातल्यावर त्यात खोबऱ्याचे काप घाला. शेंगदाणे चांगले फुटू लागल्यावर त्यात हळद तिखट घाला.मीठ घाला.
  • आता यात धने जीरे पावडर घाला. साखर व खसखस घाला. चांगले परतून घ्या. आता गॅस बंद करा. कढई खाली उतरवून त्यात हळू हळू भाजलेले पोहे घाला. परतत रहा. पूर्णपोहे टाकल्यावर पूर्ण परतून एकसारखे करा म्हणजे सर्व पोह्यांना एक सारखा रंग येईल.
  • चिवडा तयार आहे. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. (Poha Chivda)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.