अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये जीवघेणा हल्ला झाला. पेनसिल्व्हेनिया येथील बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या कानात गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संपूर्ण घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले, काल तुमचे विचार आणि प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार, कारण केवळ देवानेच अकल्पनीय घटना घडण्यापासून रोखले. आम्ही घाबरणार नाही, परंतु आमच्या विश्वासात दृढ राहू आणि वाईटाचा सामना करण्याचा निर्धार करू.आमचे प्रेम इतर पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. जे जखमी झाले ते बरे व्हावेत, यासाठी आम्ही प्रार्थना करतो तसेच, आमच्या हृदयात त्या नागरिकाची आठवण राहील, ज्याला इतक्या वाईट पद्धतीने मारले गेले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, यावेळी, आपण एकजूट राहणे आणि अमेरिकन म्हणून आपले खरे चरित्र दाखवणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे. दृढ आणि दृढनिश्चयी राहा आणि वाईटाला जिंकू देऊ नका. मी माझ्या देशावर खरोखर प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. या आठवड्यात विस्कॉन्सिनमधून आपल्या महान राष्ट्रासोबत बोलण्यास उत्सुक आहे.
(हेही वाचा आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम करतायेत; Chhagan Bhujbal यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची बटलर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या सभेच्या मंचापासून जवळपास १२० मीटर अंतरावर एका कंपनीच्या छतावर हल्लेखोर लपून बसला होता. डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच हल्लोखोराने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. हे लक्षात येताच या सभेत एकच गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षा रक्षक गोळीबारामुळे सावध झाले आणि मंचा शेजारी असलेल्या एका स्नायपरने हल्लोखोरावर निशाणा साधला आणि त्याचा खात्मा केला.
Join Our WhatsApp Community