Ashadhi Wari 2024: वारीमध्ये राजकारण का आणता?

184
Ashadhi Wari 2024: वारीमध्ये राजकारण का आणता?
Ashadhi Wari 2024: वारीमध्ये राजकारण का आणता?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

पूर्वी साहित्य संमेलन म्हटले की वाद हमखास पेटायचा. आता प्रत्येक गोष्टीत वाद आणि राजकारण करण्याची पद्धत सुरु झाली आहे. वारकरी संप्रदायाने निर्माण केलेल्या वारी या परंपरेत सुद्धा काही लोक मुद्दामून राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान समता दिंडीला शरद पवारांसह (Sharad Pawar) गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी देखील भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘वारीमधील अनुभव हा दुर्लभ होता. भक्तीच्या शक्तीतून लोक वारीमध्ये चालतात. श्रद्धेच्या मार्गावरून चाललं की एक शिस्त येते, सगळ्यांना घेऊन पुढे चालता येतं. पण जिथे अंधश्रद्धा असते तिथे लालसा येते. आज चालताना बापूंची आठवण आली. कारण सत्याग्रहाच्या दरम्यान ते अनेक ठिकाणी चालत होते. आता ‘भक्त’ या शब्दातसुद्धा फरक आहे. संविधानाला वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती अजूनही संपलेली नाही. एक शक्ती अजूनही आपल्याला वेगळं करण्याचं काम करतेय. राज्यातील निवडणुका येतील त्यात आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. राष्ट्राचा खरा आत्मा आज रस्त्यावर पाहायला मिळाला.’ (Ashadhi Wari 2024)

तुषार गांधी हे हिंदू विरोधी आहेत. त्यांना हिंदू धर्माशी काही देणंघेणं नाही. म्हणून त्यांना वारीशी देखील देणंघेणं नाही. म्हणूनच त्यांना वारीत चालताना राज्यातील येणाऱ्या निवडणुकांची आठवण होते. हिंदुंची राजकीय शक्ती असलेल्या भाजपाचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी भाजपाचे नाव न घेता केले आहे. आपले संत निःसंशय पुरोगामी होते, हिंदू धर्मात घुसलेल्या चुकीच्या गोष्टींचा त्यांनी विरोध केला. पण त्यांनी धर्म सोडला नाही, धर्माचा विरोध केला नाही. उलट अनिष्ट गोष्टी दूर करुन धर्म अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संतांचे हिंदू धर्मावर खूप उपकार आहेत. आता स्वयंघोषित पुरोगामी स्वतःची तुलना या संतांसोबत करतात. हे स्वयंघोषित पुरोगामी डावे आहेत. त्यांना हिंदू धर्म, हिंदुत्व नष्ट करायचा आहे.

(हेही वाचा – PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवं रेकॉर्ड! ‘एक्स’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले  )

अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) हे राजकीय विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी फेसबुकवर वारी संबंधित पोस्ट केली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टची खरंतर दखल घेण्याची आवश्यकता नाही. पण मराठी ऑनलाईन पोर्टल त्यांच्या पोस्ट्सच्या बातम्या प्रसिद्ध करत असतात म्हणून इथे उल्लेख करावा लागत आहे. मानेंनी संतांनी केलेल्या सुधारणांसाठी ‘विद्रोह’ असा शब्द वापरला आहे. मुळात संतांनी विद्रोह केला नसून सुधारणा घडवून आणली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. विद्रोह म्हणजे नाकारणे, उलट सुधारणा करताना तुम्हाला स्वीकारावं लागतं. संतांनी धर्माचा, भक्तीचा, ईश्वराचा स्वीकार केला आणि स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणाऱ्यांना धडा शिकवला. संतांचा मार्ग अहिंसक होता. त्यांनी तलवार हातात घेतली नाही तर आपली लेखणी, वाणी तलवारीसारखी चालवली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय म्हणाले, घटस्फोटीत Muslim महिलेला पोटगी द्या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नकार म्हणते, आम्ही शरियत कायदे मानतो)

हिंदूंवर, हिंदू धर्मावर, संतांवर गलिच्छ टीका करणाऱ्या सुषमा अंधारे देखील वारीत सहभागी झाल्या. मला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचं खूप कौतुक वाटतं. कारण त्यांच्या इतका चांगला अभिनय अमिताभ बच्चन यांना देखील जमणार नाही. बच्चन साहेब स्क्रीनसमोर अभिनय करतात आणि अंधारे थेट लोकांसमोर अभिनय करतात. त्यामुळे अंधारे यांचा अभिनय हा जीवंत अभिनय म्हणायला हवा. उबाठा गटात गेल्यानंतर आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी त्या अनेक गोष्टी करत असतात. त्यामुळे त्या वारीत सहभागी झाल्या. यापूर्वी त्यांनी सर्व संतांवर घाणेरड्या भाषेत टीका करुन झालेली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली नाही. म्हणून हिंदुंनी अखंड सावधान असलं पाहिजे. वारीला पुरोगामी म्हणत असाताना डाव्यांची पुरोगामी असण्याची व्याख्या वेगळी आहे आणि संतांची व्याख्या वेगळी आहे. वारकरी हे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले भक्त आहेत. कोणीही वारीत सहभागी झालं तरी ते विरोध करणार नाहीत. कारण प्रत्येकामध्ये विठ्ठलाला पाहणे, अशी त्यांची सात्विक भावना आहे. मात्र एकंदर हिंदू समाजाने सतर्क राहिले पाहिजे. यांचा कट कधीही यशस्वी होता कामा नये. (Ashadhi Wari 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.