Konkan Railway १५ तास उलटूनही ठप्प; विविध स्थानकात एक्सप्रेस रखडल्या

116
Konkan Railway १५ तास उलटूनही ठप्प; विविध स्थानकात एक्सप्रेस रखडल्या
Konkan Railway १५ तास उलटूनही ठप्प; विविध स्थानकात एक्सप्रेस रखडल्या

जोरदार पावसामुळे खेडानजीक दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवार, १५ जुलै रोजी ठप्प झाली आहे. त्यामुळे १५ पेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway) अनेक ठिकाणी एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या आहेत. यापैकी कोचिवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन (Konakn Express Trains) गेल्या १५ तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहे अडचण ?

खेड आणि विन्हेरे दिवाणखाटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक कधी सुरु होणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ताज्या माहितीनुसार, कोकण रेल्वेकडून वाहतूक 8 वाजेपर्यंत सुरु होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांकडून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक एक्स्प्रेस ट्रेन या ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. त्यांना मागे किंवा पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे.

प्रवाशांचे प्रचंड हाल

काल रात्रीपासून कोचीवेल्ली एक्सप्रेसमध्ये रेल्वेकडून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याशिवाय ट्रेनमधील शौचालयात पाणी नसल्याने स्त्री-पुरुष प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या सगळ्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले आहेत.

सुरुवातीला कोकण रेल्वेकडून गाडी चार तास उशिरा आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर रात्रभर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता सकाळपासून मुंबईला जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असणारी प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी बसेसची व्यवस्था कितपत पुरी पडणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.