आगामी काळात राज्यातील कोणत्याही गडकिल्ल्यांवर व पवित्र स्थळांवर मध्य प्राशन करून येणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी राज्यात कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे, असे प्रतिपादन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले. ते सोमवार, १५ जुलै रोजी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
(हेही वाचा – Konkan Rain : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, रायगडमधील शाळांना सुट्टी!)
मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गडकिल्ल्यांवरील वातावरणात एक प्रकारचे चैतन्य असते. अशा ठिकाणी आतापर्यंत कोणीही मद्यप्राशन करताना सापडल्यास त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्याच्या कलमाखाली कारवाई होत असे. अशा व्यक्तींना काही रुपयांचा दंड आकारून सोडले जायचे. मात्र आता राज्य सरकार कायद्यात बदल करुन गडकिल्ल्यांवर (Forts) मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचलेल.
गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद
या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक झाल्यासंदर्भात भाष्य केले. भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. मी सांस्कृतिक खात्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून गडकिल्ल्यांसंदर्भात गांभीर्याने काम केले जात आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी 13 ते 14 कोटी रुपये खर्च व्हायचे. मात्र, यंदा गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवले जाईल. संबंधित व्यक्तींनी सामोपचाराने ऐकले नाही, तर कठोर पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community