वादग्रस्त IAS Pooja Khedkar प्रकरणात थेट पीएमओकडून आला महत्त्वाचा आदेश!

291
वादग्रस्त IAS Pooja Khedkar प्रकरणात थेट पीएमओकडून आला महत्त्वाचा आदेश!
वादग्रस्त IAS Pooja Khedkar प्रकरणात थेट पीएमओकडून आला महत्त्वाचा आदेश!

वादग्रस्त IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणात आता थेट पीएमओकडून (PMO) महत्त्वाचा आदेश आला आहे. या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहे. प्रक्षिणार्थी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार

पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जाण्याची शक्यता आहे. (Pooja Khedkar)

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशिबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी ओबीसी भटक्या जमाती ३ या कोट्यातून प्रवेश घेतला. विशेष म्हणजे वडील आयएएस अधिकारी असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र या प्रवेशासाठी त्यांनी जोडले. त्यावेळी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख होती. (Pooja Khedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.