- ऋजुता लुकतुके
येत्या २४ जुलैला मिनी कूपर (Mini Countryman S) कंपनीच्या दोन नवीन गाड्या भारतात लाँच होत आहेत. यातली एक आहे मिनी कूपर एस म्हणजे चौथ्या पिढीतील कंट्रीमन कार. तर दुसरी आहे संपूर्णपणे इलेक्ट्रिक कंट्रीमन ईव्ही. गाडीचा जुना क्लासिक लुक पण, आतून सर्व प्रकारचे आधुनिक फिचर्स असं या गाडीचं नवीन स्वरुप असणार आहे. गाडीला आतून आधुनिक बनवतो तो आत असलेला ९.४ इंचांचा डिस्प्ले स्क्रीन. आणि सात स्पीडचा डीसीटी. भारतात या गाड्यांचं बुकिंग आधीपासूनच सुरू झालं आहे. (Mini Countryman S)
(हेही वाचा- वादग्रस्त IAS Pooja Khedkar प्रकरणात थेट पीएमओकडून आला महत्त्वाचा आदेश!)
जुन्या गाडीत आधुनिकता आणून कंपनीने नवीन डिझाईन तयार केलं आहेत. त्यात गोल हेडलाईट्स हा कंपनीचा ट्रेडमार्क आहेच. पण, यावेळी ग्रील थोडं अधिक आकर्षक आणि नेटकं आहे. तर गाडीचं बंपर इतकं साधं आणि सोपं ठेवण्यात आलं आहे की, तिथं कसलाही गजबजाट नाही. दोन पारंपरिक हेडलाईट्स आणि मिनी कूपरचा लोगो फक्त ठळकपणे दिसतो, इतकं बंपरचं डिझाईन साधं आहे. (Mini Countryman S)
Mini Cooper S, Mini Countryman EV launching in India on July 24, bookings open pic.twitter.com/hX5ASOWYhG
— The Youth Magazine (@theyouthmag_) July 5, 2024
कारची चाकं पूर्णपणे बदलली आहेत. आणि ही चाकं थोडी रुंद आहेत. गाडीची पाठची बाजू काही प्रमाणात बदलली आहेत. इथं आता टेल लाईट्सचा आकार बदललाय. दोन्ही दिवे एलईडी आहेत. या गाडीचं इंजिन २ लीटरचं पेट्रोल टर्बो इंजिन असेल. आधीच्या तुलनेत नवीन कार थोडी जास्त ताकदवान आहे. आणि ० ते १०० किमींचा वेग ही गाडी फक्त ०.१ सेकंदांत गाठू शकते. (Mini Countryman S)
(हेही वाचा- Sudhir Mungantiwar : सरकार गड-किल्ल्यावरील अतिक्रमण हटवणार; मद्यप्राशनावरही कठोर निर्बंध)
४ जणांची आसन क्षमता असलेली २ दरवाजांची ही गाडी ४७ लाखांपासून भारतात सुरू होते. (Mini Countryman S)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community