Wimbledon 2024 : जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत अल्काराझने विजेतेपद राखलं 

Wimbledon 2024 : अल्काराझचं हे चौथं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे

118
Wimbledon 2024 : जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत अल्काराझने विजेतेपद राखलं 
Wimbledon 2024 : जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत अल्काराझने विजेतेपद राखलं 
  • ऋजुता लुकतुके 

विम्बल्डनमध्ये पुरुषांचा अंतिम सामना हा गेल्यावर्षीच्या स्पर्धेची पुनरावृत्ती होती. गतविजेता अल्काराझ आणि नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आमने सामने होते. यंदा निकालाचीही पुनरावृत्ती पहायला मिळाली. स्पेनच्या कार्लोस अल्काराझने (Carlos Alcaraz) जोकोविचला ६-२, ६-२ आणि ७-६ असं आरामात हरवलं. या विजयामुळे अल्काराझने आपलं चौथं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत ४ पैकी चारही सामने जिंकण्याचा मान पटकावला आहे. (Wimbledon 2024)

(हेही वाचा- पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट; व्हिडिओ व्हायरल होताच Central Railway ला जाग)

गेल्याच महिन्यात अल्काराझने फ्रेंच ओपन जिंकली होती. तर त्यापूर्वी गेल्यावर्षी त्याने युएस ओपन जिंकली होती. लागोपाठ दोन वर्षं त्याने विम्बल्डन नावावर केली आहे. अल्काराझने जोकोविचवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. प्रत्येक सेटमध्ये त्याची सर्व्हिस किमान एकदा भेदली. (Wimbledon 2024)

जोकोविचसाठी (Novak Djokovic) हा पराभव मोठा धक्का होता. विम्बल़्डन जिंकून त्याला मार्गारेट कोर्टच्या २५ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करायची होती. तर रॉजर फेडरर प्रमाणेच त्याचं हे आठवं विम्बल्डन विजेतेपद ठरलं असतं. ही दोन्ही स्वप्न सध्या तरी भंगली आहेत. विम्बल्डन स्पर्धा व्यावसायिक झाल्यापासून विजेतेपद राखणारा अल्काराझ हा नववा खेळाडू ठरला आहे. (Wimbledon 2024)

(हेही वाचा- Zomato : मोमोजची ऑर्डर न मिळाल्याने महिलेने केली तक्रार; झोमॅटोला डिलिव्हरी न देणं कितीला पडलं महागात?)

‘मी अकरा वर्षांचा असताना एका मुलाखतीत मला विम्बल्डन जिंकायचंय असं म्हटलं होतं. ते माझं स्वप्न होतं. इतक्या लहान वयात असं काहीतरी उघड करणं धाडसाचं होतं. पण, मला खरंच विम्बल्डन खुणावत होतं. मला अजून पुढे जायचं आहे. पण, आजचा दिवस आणि इथल्या हिरवळीवर मिळवेला हा विजय संस्मरणीय आहे,’ असं अल्काराझने विजयानंतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं. (Wimbledon 2024)

क्ले कोर्टच्या मागोमाग होणारी स्पर्धा म्हणूनही विम्बल्डन आव्हानात्मक आहे. पण, फ्रेंच आणि ग्रास अशा दोन्ही कोर्टवर लागोपाठ विजय मिळवणारा अल्काराझ हा पाचवा टेनिसपटू ठरला आहे. याआधी रॉड लेव्हर, बियॉ बोर्ग, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचने ही करामत केली आहे. अंतिम सामन्यात प्रयत्न करूनही जोकोविच आव्हान उभं करू शकला नाही. सामन्याचा पहिला गेम १४ मिनिटं चालला. तो अल्काराझने जिंकला. त्यानंतर सगळं काही त्याच्या मनासारखं घडत गेलं. नाही म्हणायला तिसऱ्या गेममध्ये आधी ४-४ आणि मग ६-६ अशी बरोबरी झाली. पण, टायब्रेकवर ७-४ असा विजय मिळवत अल्काराझने सामनाही जिंकला. (Wimbledon 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.