- मुंबई प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे ९ पैकी ९ उमेदवार जिंकून आणले तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटलांच्या या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप सुरु असले तरी महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. थेट ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याचीही चर्चा आहे. नेमकं विधानपरिषद निवडणुकी दरम्यान पडद्यामागे काय घडलंय? हे जाणून घेऊयात. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Zomato : मोमोजची ऑर्डर न मिळाल्याने महिलेने केली तक्रार; झोमॅटोला डिलिव्हरी न देणं कितीला पडलं महागात?)
विधानपरिषदेच्या निवडणुकी आधीच्या बैठकीत मानापमान नाटक झाले ?
विधानपरिषद निवडणुकी पुर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासह नृपाल पाटील (Nrupal Patil) आणि शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील यांचे पुत्र व पुतणे निनाद पाटील (Ninad Patil) यांनी रात्री उशिरा बैठकीत घुसले.यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. ठाकरेंची सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला. (Uddhav Thackeray)
काँग्रेसच्या त्या आमदारांच्या पाठिंब्यावर नाराजी…
शिवसेना उबाठा गटाची स्वतःची १५ मते अधिक एक अपक्ष असे एकूण १६ मते होती. त्यात काँग्रेसच्या सात मतांची भर टाकण्यात येणार होती. परंतु काँग्रेसच्या ज्या आमदारांची नावे मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आली होती ती संशयास्पद असल्याने ठाकरे गटाने काँग्रेस कडून मिळणारी सात आमदारांची नावे बदलण्याचा हट्ट धरला. अशी एकूण २३ पहिल्यापासून तिची मते मिळवून नार्वेकर यांचा विजय होईल असे गणित मांडण्यात आले. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Euro Cup 2024 : स्पेनची इंग्लंडवर २-१ ने मात )
नार्वेकरांच्या पाठिंब्यावर काँग्रेसमध्ये दोन गट
राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरं तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी आणि कामगार पक्षाचे (पीडब्ल्यूपी) नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंना आवश्यक सात मतांचा पाठिंबा देण्याची तयारी होती, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मतं देण्याच्या भूमिकेत होते. ज्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला मोठा धोका निर्माण झाला होता. (Uddhav Thackeray)
यानंतर १२ जुलै रोजी मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल करण्यात आला. अखेरीस नाना पटोले, के.सी. पाडवी, सुरेश वरपुडकर, शिरीष चौधरी, सहस्राम कोरोटे, मोहनराव हंबर्डे आणि हिरामण खोसकर या सात नावांवर यूबीटी सेनेच्या समर्थनार्थ प्रस्ताव अंतिम करण्यात आला. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट; व्हिडिओ व्हायरल होताच Central Railway ला जाग)
काँग्रेसच्या समंजस भूमिकेमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नाराजी वर अखेर तोडगा काढण्यात आला. त्यामुळेच शेवटी मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community