Chhagan Bhujbal अचानक सिल्व्हर ओकवर; Sharad Pawar यांच्या भेटीत काय घडले ?

193
Chhagan Bhujbal अचानक सिल्व्हर ओकवर; Sharad Pawar यांच्या भेटीत काय घडले ?
Chhagan Bhujbal अचानक सिल्व्हर ओकवर; Sharad Pawar यांच्या भेटीत काय घडले ?

मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती. त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते झोपलेले होते. म्हणून मी एक ते दीड तास थांबलो. उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही. मी मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. महाराष्ट्रात सध्या ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असे आवाहन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना केले आहे.

(हेही वाचा – Wimbledon 2024 : जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत अल्काराझने विजेतेपद राखलं )

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छगन भुजबळ हे १५ जुलै रोजी सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

शरद पवारांनी पुढाकार घेण्याची मागणी

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले की, जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले, हे आम्हाला माहिती नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते, तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे. राज्यांत ओबीसी अरक्षण देण्याचं काम पवारांनी केल आणि आता राज्यांत काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. मी त्यांना आठवण करून दिली की, बाबासाहेब अंबेडकर नाव देण्यावेळी मराठवाडा पेटला होता त्यावेळी देखील आपण पुढाकार घेतला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.