- ऋजुता लुकतुके
‘तू एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्त होणार का,’ या प्रश्नाला रोहित शर्माने जाहीरपणे दिलेलं उत्तर लोकांनी टाळ्यांच्या गजरात साजरं केलं आहे. एका खाजगी कार्यक्रमात हा प्रसंग घडला. झालं असं की, टी-२० विश्वचषक भारताने जिंकल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० विश्वचषकातून आपली निवृत्ती जाहीर केली. दोघांमध्ये रोहित ३६ वर्षांचा असल्यामुळे त्याच्या निवृत्तीवर लगेचच चर्चा सुरू झाली. एकदिवसीय आणि कसोटीतून रोहित लवकरच निवृत्त होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, या प्रश्नाला रोहितने स्वत: उत्तर दिलं आहे. (Rohit Sharma)
‘२-३ वर्षांपलीकडचा विचार मी करत नाही. आतामध्ये जगतो. त्यामुळे नक्कीच आणखी काही वर्षं तुम्ही मला खेळताना बघणार आहात,’ असं रोखठोक उत्तर रोहितने एका खाजगी कार्यक्रमात दिलं. रोहितच्या उत्तराचा हा भाग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि लोकांनी टाळ्या वाजवून रोहितच्या उत्तराचं स्वागत केलं आहे. (Rohit Sharma)
At least you will see me playing for a while! Says Rohit Sharma in Dallas. pic.twitter.com/wADSJZj6b5
— Vimal कुमार (@Vimalwa) July 14, 2024
(हेही वाचा – Wimbledon 2024 : जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत अल्काराझने विजेतेपद राखलं)
रोहितने निदान २ वर्ष खेळण्याची तयारी दाखवली
मागच्याच महिन्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रोहित भारताचं नेतृत्व करेल असं म्हटलं होतं. आता रोहितने निदान २ वर्ष खेळण्याची तयारी दाखवली आहे. २९ जूनला भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यावर रोहितने बक्षीस समारंभाच्या वेळी टी-२० प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली होती. (Rohit Sharma)
‘मी टी-२० विश्वचषकातूनच माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला २००७ मध्ये सुरुवात केली होती. आता या प्रकारातून निवृत्त होण्यासाठी दुसरी चांगली वेळ नाही. मला हा चषक हवा होता. मला खूप तीव्रतेनं हा चषक हवा होता. तो हातात आला याचा मला खूप जास्त आनंद आहे,’ असं रोहित टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर म्हणाला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहितच्या नावावर ४,२३१ धावा जमा आहेत. या प्रकारात आतापर्यंत सर्वाधिक शतकं (५) रोहितनेच केली आहेत. (Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community