सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार

160
सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामनातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आम. ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी (१५ जुलै) खास संजय राऊत यांचा “श्रीमान मोरारजी राऊत” असा उल्लेख करुन जोरदार व खोचक शब्दात पलटवार केला. (Ashish Shelar)

आम. शेलार यांनी सोमवारी एक्सवर एक पोस्ट टाकून या अग्रलेखाला दिलेल्या प्रत्युत्तरात असून त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नविन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून “हग्रलेख” लिहितात? (Ashish Shelar)


(हेही वाचा – राज्यसभेतील Congress च्या विरोधी पक्षनेतेपदाला धोका!)

उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले…

आता ‍विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील… मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळयांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळ्या कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना? अशी विचारणा करत वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय? चोर तर चोर वरुन शिरजोर? अशा शब्दांत त्यांनी खा. राऊत यांना चांगलेच खडसावले. (Ashish Shelar)

मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात मराठी माणासावर गोळ्या झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? काँग्रेसशी हात मिळवणी केलीत त्यामुळे तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले असून तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का, दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना “आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं” म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात! अशा शब्दांत आम. शेलार यांनी राऊत यांना झापले. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.