महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘अस्तित्व’ नाटकाचे विशेष प्रयोग करण्यात येत असून घनकचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अभिनव उपकम ठरणार आहे. यासाठी १९ जुलै २०२४ रोजी मुलुंड (पश्चिम) येथील महाकवी कालिदास नाट्यगृह, २२ जुलै रोजी बोरिवलीतील (पश्चिम) प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह आणि दिनांक २३ जुलै रोजी भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात प्रयोगांचे विनाशुल्क आयोजन करण्यात आले आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे सर्व प्रयोग विनाशुल्क आहेत. (BMC)
अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व
महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांच्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’ या संस्थेने साकारलेले ‘अस्तित्व’ नाटक सध्या रंगमंचावर गाजत आहे. रोजच्या जगण्यात वाढत जाणाऱ्या अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व शोधणार हे कौटुंबिक नाटक आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात भरत जाधव यांच्यासह चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर प्रमुख भूमिकेत आहेत. जुलै महिन्यात १९, २२ आणि २३ रोजी ‘अस्तित्व’ या नाटकाचे विशेष प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनादेखील मोफत प्रवेश आहे. (BMC)
(हेही वाचा – सामनातील पंतप्रधानांच्या टीकेवरुन Ashish Shelar यांचा राऊतांवर पलटवार)
कामगारांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था
या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी, जी दक्षिण, जी उत्तर या आठ विभाग कार्यालयातील प्रत्येकी ३५ स्वच्छता कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार के. सी. ठाकरे नाट्यमंदिरात एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर या ९ विभागातील प्रत्येकी २५ कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी, तर २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ए, बी, सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग कार्यालयातील प्रत्येकी २२ कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी ‘अस्तित्व’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यावेळी कामगारांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. (BMC)
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित ‘अस्तित्व’ नाटक
स्वच्छता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ‘अस्तित्व’ नाटकाचे विशेष प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित ‘अस्तित्व’ नाटकाचे खास प्रयोग होणार आहेत. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे सर्व प्रयोग विनाशुल्क आहेत. (BMC)
सफाई कामगारांच्या परिवाराला ऊर्जा मिळावी, यासाठी…
महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी संपूर्ण शहरातील कचरा संकलित करतात. मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी, ते रोज करीत असलेल्या कामातून त्यांना त्यांच्या परिवाराला ऊर्जा मिळावी, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी हे नाटक कर्मचाऱ्यांना दाखविण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेले हे नाटक महानगरपालिकेच्या नाट्यगृहांमध्ये दाखविण्यात येणार आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community